Home > Election 2020 > राजू शेट्टींचा प्रचार करणार बॉलिवुडचा तो ‘खलनायक’

राजू शेट्टींचा प्रचार करणार बॉलिवुडचा तो ‘खलनायक’

राजू शेट्टींचा प्रचार करणार बॉलिवुडचा तो ‘खलनायक’
X

काही चित्रपटात नायकाच्या भूमिकेपेक्षा खलनायकाची भूमिका जास्त भाव खाऊन जाते आणि ते पात्र प्रेक्षकांच्या ह्रदयात घर करतं. अलिकडेच आलेला सिंघम चित्रपट आणि या चित्रपटातील प्रेक्षकांच्या मनात घर केलेले खलनायक अर्थात जयकांत शिक्रे... ‘आता माझी सटकलीय रे’ म्हणणारे प्रकाश राज. आता हे प्रकाश राज महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा प्रचार करणार आहेत. प्रकाश राज देखील निवडणूकीच्या आखाड्यात असून ते कर्नाटकमधून (Bengaluru Central) निवडणूक लढत आहेत.

प्रकाश राज राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ हातकणंगले मतदारसंघात 19 किंवा 20 एप्रिलला सभा होणार आहे. राजू शेट्टी यांनी देशातील शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रकाश राज राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ हातगंणगले मतदारसंघात सभा घेणार असल्याचं सांगितले जात आहे..

प्रकाश राज यांनी मध्यंतरी सोशल मीडियावर #citizensvoice #justasking अशा मोहिम चालवल्या होत्या. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Updated : 9 April 2019 4:15 AM GMT
Next Story
Share it
Top