Home > मॅक्स रिपोर्ट > महाज्योती विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीअभावी परवड

महाज्योती विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीअभावी परवड

महाज्योती विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीअभावी परवड
X

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात या अंतर्गत अनेक संस्था कार्यरत आहेत याच धर्तीवर OBC आणि VJNT या समाजातील प्रवर्गासाठी महा ज्योती नावाची संस्था कार्यरत आहे मात्र इतर संस्थांच्या तुलनेत महाज्योती कडून या विद्यार्थ्यांना कुठलीही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचं या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.यासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असतानासुद्धा कुठलाही प्रकारचा न्याय मिळाला नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे पुणे हे शहर शिक्षणाचा माहेरघर म्हणून ओळखले जातात व राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी येतात मात्र सर्व सामान्य परिस्थितीतून आल्यानंतर आर्थिक स्थैर्य नसल्याने शासनाच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यातीलच महाज्योती मात्र या विद्यार्थ्यांना या महाज्योतीचा कुठलाच लाभ होत नसल्याचं चित्र आहे.

महात्मा ज्योतीबा फुले यांचे आधुनिक समाजाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रण महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्याकरीता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता "महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था" (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांतील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृध्दी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून आधुनिक कटिबद्ध समाज निर्मितीकरीता स्वतःस समर्पित करण्यास कटिबद्ध आहे.

आशिष पवार सांगतात,की महाज्योती संस्था ही ओबीसी VJNT या समाजातील mpsc upsc ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि बाकी समाजातील हिता साठी स्थापन केली आहे..आमची मागणी आहे सगळ्या सोयीसुविधा या सारथी या संस्थेच्या धर्तीवर उपलब्ध करून देण्यात यावे..1. विद्यावेतन पुढील 2 वर्षा साठी प्रत्येकी 12000 रू..2000 हजार एमपीएससी तयारी करणाऱ्या मुलांना..आणि 1000 upsc तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..2. कोचिंग क्लासेस ऑफलाईन घेण्यात यावे..3. कोचिंग निवड करताना पर्याय देण्यात यावे .

प्रदीप पवार सांगतात की, महाज्योती (mahajyoti) संदर्भात मुलांची मुळ मागणी ऑफलाईन क्लासेस आणि विद्यावेतनची असताना..मुलाना न विश्वासात घेता. ऑनलाईन कोचिंग च घाट घालून.5000रू च टॅब मुलाना वाटून मोठा वाटा यांना ग्याचं असेल... आर्थिक हितसंबध यांचे.. गुंतलेलं.असतील..मुलांनी पुणे, नागपूर, औरगाबाद येथे आंदोलन केले असताना मुलांच्या मागण्या न दाखल हे संचालक मंडळ घेत नाही आहे. मंत्री विजय वेडट्टीवार या मागण्यांना कड दुर्लक्ष करून चालढकल करत आहेत.. लवकर मागण्या मान्य न झाल्या स मोठ आंदोलन करू. प्रवीण मुंढे सांगतात ..,मा.बबनराव तायवडे सर व संपूर्ण संचालक मंडळ कडे आम्ही मुलांनी निवेदन केलेत आमच्या हक्काच्या मागण्यासाठी महाज्योती ने Mpsc प्रशिक्षणासाठी २ हजार विद्यार्थ्यांची निवड केली त्याचे प्रमाण बघता फक्त १०% विद्यार्थी ऑनलाईन क्लास करत आहेत,अनुपस्थितीचे प्रमाण ९०% असतांना महाज्योती ऑनलाईन क्लास विद्यार्थ्यांवर का लादत आहे.

तरी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित ऑफलाईन क्लास घेण्यात यावे व Mpsc/Upsc च्या विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन देण्यात यावे. याबाबत जर तात्काळ कृती केली नाहीतर विद्यार्थी तीव्र आंदोलन करतील याची दखल घ्यावी, आम्ही येत्या सोमवारी यासंदर्भात महाज्योती विरूद्ध मा.उच्च न्यायालय मुंबई इथं याचिका दाखल करत आहोत. भविष्यात महाज्योतीच्या बदनामीबद्दल संबंधित मंत्री व महाज्योती संचालक मंडळ जबाबदार राहील हे लक्षात असु द्यावे.

राम बनसोड सांगतात,MPSC आणिUPSC साठी निवड झालेल्यांपैकी बरेचसे विद्यार्थी घर सोडून बाहेर राहून तयारी करतात आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे तरी महाज्योतीकडुन विद्यावेतन देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. सर्व विद्यार्थ्यांची रास्त मागणी मान्य करावी.

दुसरीकडे सारथी आणि बार्टी ऑनलाइन क्लास असताना विद्यावेतन देत आहेत मग फक्त महाज्योतीच्याच विद्यार्थ्यांवर अन्याय का होत आहे. सर्व महाराष्ट्रभर शाळा ,कॉलेज, क्लासेस ऑफलाईन सुरू असताना आमच्या माथी तुम्ही ऑनलाईन क्लास मारत आहात. ऑनलाइन क्लास मधुन विद्यार्थ्यांच कुठलही हित साधले जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्हा विद्यार्थी पुढे आंदोलना शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही याची आपण गंभीर दखल घ्यावी. विद्यार्थीच्या होणार्या नुकसानीस आपण जबाबदार असु.

प्रशांतचव्हाण सांगतात #ओबीसी व भटके विमुक्त विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या #महाज्योती संस्थेला आपली जहागीर समजून मनमानी कारभार सुरू आहे. #MPSC व #UPSC च्या विद्यार्थ्यांना #सारथी आणि #बार्टीकडून प्रतिमहिना १० ते २५ हजार निधी मिळतो.महाज्योती मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करतेय. ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत.

#प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का? फक्त निवडणूक आली म्हणजे यांना समाजाचा पुळका येतो फक्त मतांच राजकरण करण्या साठी आणि आता समाजातील मुलाना न्याय देण्यासाठी पाठ दाखवता असली बेइमानी खपून घेणार नाही.. रस्त्यावर उतरू. आता यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी महा ज्योती चे प्रशासकीय अधिकारी प्रदीप डांगे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. प्रदीप डांगे म्हणाले सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू आहे व त्या पद्धतीची संपूर्ण तयारी झाली आहे त्यामुळे शिष्यवृत्तीचा प्रश्नच उद्भवत नाही यापुढे बोलण्यास त्यांनी नकार दिला.

काय आहेत मागण्या?

सर्व विद्यार्थ्यांना विद्या वेतन मिळावे

ऑनलाईन प्रशिक्षण न घेता ऑफलाइन प्रशिक्षण वर्ग सुरु करावे

ऑफलाइन क्लास निवडत असताना विभागानुसार क्लास निवडण्याची सवलत द्यावी

स्पर्धा परीक्षेची प्रथम परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्याला 25 हजार रुपये शिष्यवृत्ती द्यावी

यावा अशा मागण्या या विद्यार्थी स्तरातून केल्या जात आहेत.

काय आहे महा ज्योती

समताधिष्ठित आधुनिक भारतीय समाज निर्मितीकरीता थोर महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले. महात्मा ज्योतीबा फुले हे या समाजक्रांतीचे अग्रदुत होत. समता, न्याय आणि बंधुता या त्रितत्वावर आधारित आधुनिक समाज स्थापनेकरीता त्यांनी स्वतःच्या घरुनंच समाजक्रांतीचे रण फुुुंकले. विषमातावादी आणि परंपरावादी निष्क्रिय भारतीय समाजास समतामूलक तत्वांनी आणि विचारांनी तेजोमय केले. स्त्रिशिक्षण, अस्पृशांना शिक्षण, बालविवाह प्रतिबंधक, विधवा विवाह, शेतीसुधारणा, अनाथाश्रम, भृणहत्या प्रतिबंध, विधवा केशवपन बंदी इत्यादी विविध सामाजिक क्षे़त्रात त्यांनी क्रांतीकारी कार्य केले. एवढेच नाही तर सत्यशोधक समाजाची स्थापना करुन मानवतावादी नवसमाजाची मुहूर्तमेढ रोवली आणि आधुनिक पुरोगामी महाराष्ट्राचे जनक ठरले.

कार्यक्षेत्र व घटक

कृषी संशोधन, मूल्यांकन, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार क्षमता वाढवणे.

स्वयंरोजगार, उद्योजकता, कृषी औद्योगिक युनिटसह औद्योगिक एककांची स्थापना आणि विकास करणे.

डेटा बँका, ग्रंथालयांची स्थापना (विकास व देखभाल करणे), विविध सर्वेक्षण करणे.

विद्यार्थी, विद्वान, उद्योजक, शेतकरी आणि महिलांच्या वंचित घटकांसाठी कृषी आणि सहकारी संशोधन,मार्गदर्शन व सल्ला केंद्र.

विविध स्पर्धात्मक परीक्षा, करिअरच्या विकासासाठी प्रशिक्षण, कोचिंग इत्यादीं.

विविध क्षेत्रातील ज्ञान, अभ्यास व समन्वय मंडळे

लक्ष्य गटांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार.

शैक्षणिक शिष्यवृत्ती, फेलोशिप इ. संस्था आणि अनुदान या मार्फत ध्येयपुर्ती करणे.

मात्र याकडे महाज्योती पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे व यामुळे राज्यभरातील तीन हजार लाभार्थी या लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे

यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी या लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

Updated : 20 Nov 2021 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top