Home > Election 2020 > Lok Sabha Elections 2019 Phase 1 Voting: गडचिरोली, नक्षलवाद्यांचा स्फोट, मतदारांमध्ये भितीचं वातावरण
Lok Sabha Elections 2019 Phase 1 Voting: गडचिरोली, नक्षलवाद्यांचा स्फोट, मतदारांमध्ये भितीचं वातावरण
Max Maharashtra | 11 April 2019 2:15 PM IST
X
X
सतराव्या लोकसभेसाठी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 7 मतदार संघांचा समावेश असून अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. देशात किरकोळ घडामोडी सोडता सर्वत्र शांततेत मतदान सुरु असताना गडचिरोलीतील दूर्गम एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी या मतदान केंद्राजवळ
आज सकाळी 11.30 ला भूसुरूंग स्फोट झाला आहे.
हा स्फोट नक्षलवाद्यांनी घडवून आणला असल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांचं म्हणनं आहे. दरम्यान यात कोणतेही नुकसान झालं नसून काल पासून ही दुसरी घटना आहे.
दूर्गम गावातील मतदारांमध्ये सुप्त भितीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज कोरची तालुक्यातील चार मतदान केंद्रे अचानक बदलण्यात आल्याची माहिती तालुका निवडणूक अधिकारी नारनवरे यांनी दिली आहे. गडचिरोलीत बारा वाजेपर्यंत एकुण 284621 पैकी 158070 मतदारांनी मतदान केले. गडचिरोलीतुन प्रदेश काँग्रेस वॉर रूमच्या वतीने चार इव्हीएम मध्ये बिगाड झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
Updated : 11 April 2019 2:15 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire