Home > Election 2020 > खरंच ममता बॅनर्जी मोदींना भेटवस्तू पाठवतात का? वाचा: काय म्हणाल्या

खरंच ममता बॅनर्जी मोदींना भेटवस्तू पाठवतात का? वाचा: काय म्हणाल्या

खरंच ममता बॅनर्जी मोदींना भेटवस्तू पाठवतात का? वाचा: काय म्हणाल्या
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार ने नुकतीच एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना एक किस्सा सांगितला. ममता बॅनर्जी मला अजूनही वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात. यावेळी मोदींनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या वैयक्तिक सबंधाची माहिती देत राजकारणी लोकांचे राजकारणाच्या व्यतिरिक्त मैत्रीचे सबंध असू शकतात, याचे उदाहरण दिले. तसंच यावेळी त्यांनी काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण सबंध असल्याचे देखील सांगितले होते. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या या वक्तव्यावर एका प्रचारसभेत मोदींचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला...

“ मी लोकांना रसगुल्ले पाठवते, मी पुजेच्या दरम्यान भेटवस्तू पाठवते आणि चहा देखील पाजते... मात्र, मी एकही मतदान देणार नाही’’ असं म्हणत मोदींचे नाव न घेता मोदींना टोला लगावला आहे.

Updated : 25 April 2019 3:32 AM GMT
Next Story
Share it
Top