Home > Election 2020 > प्रज्ञासिंह यांच्यावर अखेर कारवाई, 72 तास प्रचारबंदी!

प्रज्ञासिंह यांच्यावर अखेर कारवाई, 72 तास प्रचारबंदी!

प्रज्ञासिंह यांच्यावर अखेर कारवाई, 72 तास प्रचारबंदी!
X

शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वादात अडकलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाने बाबरी मशिदीबद्दलच्या वक्तव्यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. ‘निश्चित स्वरूपात राम मंदिर बांधण्यात येणार असून हे एक भव्य मंदिर असेल.’ यानंतर मंदिर उभारण्यासाठीच्या वेळमर्यादेबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रज्ञा यांनी सांगितले की,

'आम्ही मंदिर बांधणार. शेवटी (बाबरी मस्जिद)ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी आम्हीच तेथे गेलो होतो’.

या त्यांच्या विधानावरुन निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. त्यांनी दिलेल्या उत्तरावर आयोगाचे समाधन न झाल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मी बाबरी मशिदीवर चढून ती पाडण्यासही मदत केली होती. मी चढाई करून ढाचा तोडला. हे काम करण्यासाठी देवानं मला संधी दिली, याचा मला अभिमान आहे. मला शक्ती मिळाली आणि मी ते काम पूर्ण केलं. आता त्याच जागेवर राम मंदिर उभारणार.

असं वादग्रस्त विधान केलं आहे.

दरम्यान मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर या विधानावरुन त्यांना माफी मागावी लागली होती.

काय म्हणाल्या होत्या प्रज्ञा ठाकूर?

प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला.

“तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”,

असा आरोप प्रज्ञा सिंह यांनी केला. हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान प्रज्ञा सिंह यांनी केले होते.

Updated : 2 May 2019 5:16 AM GMT
Next Story
Share it
Top