Home > मॅक्स रिपोर्ट > लॉकडाऊनचा मटन व्यावसायिकांवर काय परिणाम झाला

लॉकडाऊनचा मटन व्यावसायिकांवर काय परिणाम झाला

लॉकडाऊनचा मटन व्यावसायिकांवर काय परिणाम झाला
X

मुंबईत वसलेल्या खाटीक समाजात मराठी मुस्लिमांची संख्या जास्त आहे. अर्थकारण, रोजगार, व्यवसायाची संधी, कुटुंबाचं पालनपोषण... अशा विविध कारणांसाठी आजही देशभरातून मुंबईच्या दिशेनं लाखोंची पावलं वळतात. याच उद्देशानं कधी काळी मुंबईत आलेला खाटीक समाजही आता इथे स्थिरावला आहे. पक्का मुंबईकर झाला आहे. मुंबईतील कत्तलखान्याच्या इतिहासात डोकावून पाहिलं, तर जवळपास एक शतकाहून अधिक काळ या व्यवसायाची सूत्रं खाटीक समाजाकडेच असलेली दिसतात.

मुंबईत मटन खाणाऱ्यांना ताज्या मटनाचा पुरवठा करण्यात नेहमीच खाटीक समाजाचा पुढाकार राहिला आहे. पिढ्यान् पिढ्या खाटीक समाजाकडून हाच व्यवसाय सुरूच होता. साधारणपणे औरंगाबाद, जालना, सांगली, जत, कोल्हापूर, सातारा आदी भागातून या व्यवसायात समूह येत गेले.

सुरुवातीला तेथूनच मुंबईत मटणाचा पुरवठा केला जायचा. मात्र, वांद्रे येथील खाटीकखाना हा ऐन भरात असतानाच मुंबई पालिकेनं हा कत्तलखाना देवनार येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतला खाटीक व्यवसाय सुरुवातीपासूनच शेळ्या-मेंढ्यांचा सांभाळ करणारा धनगर समाज आणि कसाई समाज यांच्या ताब्यात आहे.

तेव्हापासून व्यवसायाच्या निमित्तानं एकमेकांशी जोडला गेलेला व्यावसायिक बंधुभाव आजही कायम आहे. कत्तलखान्यामध्ये खाटीक आणि धनगर समाजाचा वरचष्मा राहिला आहे. खाटीक समाज हा प्रामुख्याने बकरे विक्री, खाटीक आदी कामात कार्यरत होता. आजही मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात मटणास मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि निर्यातीपासून ते स्थानिक मागणीपर्यंतचा सर्व पुरवठा खाटीक समाजच करतो.

मुंबईत बक्कर कसाई जमात ही कोळी, आगरी समाजाप्रमाणेच जुनी असल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे आणि जवळपास खाटीक समाज हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालूच आहे. पण आत्ता ही सगळी पार्श्वभूमी बदललेली आहे. 2016 ला झालेल्या नोटाबंदीच्या फटक्यामुळे सर्व लघू उद्योगांना फटका बसला होता. त्यात खाटीक समाजाचा व्यवसायाचा देखील समावेश आहे. त्यांची देखील बिकट अवस्था ही बिकट झाली होती.

त्यानंतर पारंपरिक व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायाने कशीबशी तग धरली आणि पुन्हा रुळावर आली. पण त्यांच्या आर्थिक चक्रामध्ये फारसा काही फायदा झालेला नाही. आत्ता 2020 मध्ये आलेलं कोरोनाच्या संकटाने सगळ्या व्यवसायाची खाटच पाडली. लहान उद्योग रसातळाला गेले आहेत.

लॉकडाऊन काळात सगळी दुकान आणि मार्केट बंद होती लोक घरातून बाहेर सुद्धा पडत नव्हते अश्या परिस्थितीत खाटीक समाजाचा व्यवसाय तरी कसा चालणार? राज्य सरकार आत्ता अनलॉक च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे थोडी फार प्रमाणात शिथिलता लहान व्यावसायिक आणि लोकांना मिळत आहे. पण तरी देखील खाटीक समाजाचा व्य़वसाय या लॉकडाऊन च्या काळात तितकाशा प्रमाणात चालत नाही. या संदर्भात आम्ही खाटीक समाजाचे मटन विक्रेते व्यावसायिक मुन्नवर शेख यांच्याशी बातचीत केली...

लॉकडाऊन चा खूप मोठा फटका आमच्या व्यवसायाला बसला आहे आणि या परिस्थिती माझ्याकडे 5 जण कामाला होते. त्यांना या लॉकडाऊन च्या काळात पगार कसा द्यायचा? घर, व्यवसाय कसं चालवायचं हा प्रश्नच आहे. आत्ता अनलॉक होत आहे. पण त्या अनलॉक चा खास असा परिणाम होत नाही. पण गिऱ्हाईक थोड्या प्रमाणात येत आहे. जो पर्यंत लोकांच्या खिशात पैसे येणार नाही. तो पर्यंत आमच्या लहान व्यावसायिकांच्या खिशात पैसे येणार नाही.

या सरकारचे नियम आणि काम करण्याची पद्धत थोडी फार चांगली आहे. पण अनलॉक च्या नियमांमध्ये अजून थोड्या प्रमाणात शिथिलता दिली पाहिजे. हेच माझं म्हणणं आहे. त्यामुळे माझ्यासारखे अजून खूप सारे व्यावसायिक आहेत. त्यांचं सुद्धा व्यवसाय चालेल जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. पण आमची आर्थिक स्तिथी पूर्वपदावर येण्यासाठी अजून खूप वर्ष जातील.

अशीच काहीशी अवस्था बाकी दुकानदारांची आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व घटकांच्या स्तरातून लोकांच्या भावना आहे. तरी राज्यसरकार असो केंद्र सरकार असो. सामान्य लघू उद्योजक सर्वाचंचं कंबरडं या लॉकडाऊन मध्ये मोडलं आहे.

Updated : 26 Sep 2020 3:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top