Home > मॅक्स किसान > Lock Down : पान टपऱ्या बंद झाल्यानं, पान उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

Lock Down : पान टपऱ्या बंद झाल्यानं, पान उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

Lock Down : पान टपऱ्या बंद झाल्यानं, पान उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
X

खाईके पान बनारसवाला… हे गाणं आपण नेहमीच गुणगुणत असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे या पानावर बंदी आली आहे. कोरोना व्हायरस चा धोका लक्षात घेता सरकारने सर्व जीवनावश्यक सुविधांची दुकान वगळता सर्व दुकान बंद केली आहेत. विशेष बाब म्हणजे सरकारने लोकांनी पान खाऊन कुठंही थुंकू नये. म्हणून पानाची सर्व दुकान बंद करण्याचा अगोदरच निर्णय घेतला आहे. याचा फटाका पान टपरी चालकांबरोबरच पान वेली शेतकऱ्यांना देखील बसला आहे.

खरं तर पान वेली उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्यवसायाचा काळ. उन्हाळ्याच्या तोंडावर पान वेलीचं भरघोस उत्पन्न होत असतं. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे देशात Lockdown जाहीर करण्यात आले आहे. मात्र, पान वेलीच्या उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

राज्यातील सर्व हॉटेल, लग्न समारंभ, पानटपरी चे दुकान, पान मसाला दुकान ही सध्या बंद आहेत. विशेष म्हणजे या काळात पानाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, लॉकडाऊन च्या काळात या पान वेलींची मागणी घटली आहे. त्यामुळं पान वेली उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या लॉकडाऊन ची फार मोठी आर्थिक झळ पान वेल उत्पादक शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.

नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील चाभरा या गावात शेकडो पान वेलींचे मळे आहेत. त्यात पानं तोडण्यासाठी असंख्य मजुरांना बाराही महिने काम मिळत असते. विशेषतः उन्हाळ्यात लग्न सराईमुळे पान शौकिनांची संख्या अधिकची असते. त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत असतो.मात्र, यंदा lockdown मुळे पानवेली जाग्यावरच पडून आहेत. त्यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याचं शेतकऱ्याने मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले.

या संदर्भात आम्ही पानवेली शेतकरी पांडुरंग चाबरेकर यांच्याशी बातचित केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ही आमची परंपारिक शेती आहे. दोन एकर पान मळ्याच्या शेती मध्ये जवळ जवळ १० कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मार्च एप्रिल हा आमचा उत्पन्नाचा महिना आहे. आणि त्यातच उत्पन्नाच्या या महिन्यांमध्ये Lock Down झालं. आणि १० कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षी खर्च वजा जाता आम्हाला एक लाख रुपयाचे उत्पन्न होते. Lock Down मुळं मळ्यातला मळ्यातच राहिला. बाजारात जाण्याचा काही प्रश्न च नाही. दरवर्षी या वेळेला २००० पानांचं टोपलं कमीत कमी १००० रुपयाला विकत होतं. आता त्याला कोणी २०० रुपयाला घ्यायला तयार नाही.

आमच्या गावात असे २५ मळे आहेत. त्यामुळं एका महिन्यात आमच्या गावात २५ लाख रुपयाचे नुकसान झालं आहे. हा महिना तर सिझन चा महिना होता. लॉकडाऊन मुळं हे सर्व उत्पन्न घटणार आहेत. हिरवेगार पानाच्या मळ्यात उभा राहून पांडुरंग आपल्या पान वेली शेतीत झालेल्या नुकसानीबाबत माहिती देत होते.

Updated : 11 April 2020 5:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top