Home > Election 2020 > मुबंईतील २६० संवेदनशील मतदार केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंग

मुबंईतील २६० संवेदनशील मतदार केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंग

मुबंईतील २६० संवेदनशील मतदार केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंग
X

लोकसभा निवडणुकीची तयारी शासनाकडुन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिलला होणाऱ्या मुंबई जिल्हा क्षेत्रातील मतदार संघात मतदान केंद्रावर एकूण 260 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुविधा यंदा भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहरच्या उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना दिलीय.

वेबकास्टिंग म्हणजे काय?

कॉम्प्युटरसमोर घडलेल्या घटनेचे चित्रण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचवेळी दुसऱ्या कॉम्प्युटरवर किंवा मोठ्या पडद्यावर उपलब्ध करून देणे म्हणजे वेबकास्टिंग होय. हे चित्रण थेट निवडणूक आयोगाला नियंत्रण कक्षात पाहता येते. २९ एप्रिलला मुंबई लोकसभा मतदारसंघातील 260 संवेदनशील मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुविधा भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

https://youtu.be/uRy9ChsfAWk?t=1

Updated : 22 April 2019 9:14 AM GMT
Next Story
Share it
Top