Home > Election 2020 > राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा कॉंग्रेसचा दावा; स्नायपरनं गोळ्या झाडण्याचा प्रयत्न?
राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा कॉंग्रेसचा दावा; स्नायपरनं गोळ्या झाडण्याचा प्रयत्न?
Max Maharashtra | 11 April 2019 4:04 PM IST
X
X
आज सोनिया गांधी यांनी रायबरेली इथं लोकसभा निवडणूकीचा उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर युपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर लेझर लाईट चमकला. त्यानंतर आता कॉंग्रेसने
'काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर स्नायपरनं 7 वेळा गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला,'
असा दावा केला आहे. गांधी परिवारातील दोन व्य़क्तींचा आत्तापर्यंत पंतप्रधान पदावर असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची सुरक्षा व्यवस्थेबाबत हलगर्जीपणा झाला का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या संदर्भात काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर गृहमंत्रालय काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान अद्यापपर्यंत या व्हिडीओची सत्यता समोर आलेली नाही.
https://youtu.be/zI2I7A2EH-k
Updated : 11 April 2019 4:04 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire