Home > मॅक्स रिपोर्ट > Exclusive : जे जे तील बोगस कलाकाराचा पर्दाफाश

Exclusive : जे जे तील बोगस कलाकाराचा पर्दाफाश

मुंबई विद्यापीठ असो वा महाराष्ट्र शासन सगळ्यांच्याच डोळ्यात धुळफेक करत जे जे स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयातील आर्किटेक्चर विभागात एक कलाकार गेल्या दहा वर्षांपासून ठाण मांडून बसलाय. पण तो कलाकारच बोगस असल्याचं समोर आलंय. याच बोगस कलाकाराचा पर्दाफाश करणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा Exclusive रिपोर्ट....

Exclusive : जे जे तील बोगस कलाकाराचा पर्दाफाश
X

उद्धव ठाकरे ते राज ठाकरे पर्यंत अशा अनेक दिग्गजांच्या कलागुणांना ज्या महाविद्यालयानं पैलू पाडले. देशविदेशात अनेक दर्जेदार कलावंत घडवले. भारताच्या कलाक्षेत्राला आजही अनेक नामवंत कलाकार पुरविणाऱ्या जे.जे. महाविद्यालयात मागील कित्येक वर्षांपासून एक ‘बोगस कलाकार’ ठाण मांडून बसलाय. विशेष म्हणजे हा ‘बोगस कलाकार’ सरकारच्या आशीर्वादाने बसल्याचं समोर आलंय.

जे जे स्कूल ऑफ आर्ट या नामांकित महाविद्यालयातील सर्वात मोठी बोगसगिरी सुरूय. त्याचे धक्कादायक मॅक्स महाराष्ट्रवर करण्यात आले आहेत.

गेली दहा वर्षे या कलाकाराकडे कुणाचच लक्ष नाही. हा बोगस कलाकार जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये बिनधास्तपणे वावरतोय. एवढंच नाही तर त्या बोगस कलाकाराचे सरकारकडून जोरदार लाड सुरू आहेत.

आधी जे जे महाविद्यालयातील आर्किटेक्चर विभाग आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाचं कला संचालनालय या बोगस कलाकाराला आंदण दिलंय. पण याकडे कुणाचच लक्ष नाही.

2015 मध्ये या कलाकाराची तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी प्रोफेसर बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली या कलाकाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्या चौकशी समितीचा अहवाल येऊनही हा बोगस कलाकार त्याच पदावर कायम आहे. पण हे कुणाच्या आशिर्वादाने?

राजीव मिश्रा हे त्या कलाकाराचं नाव. ज्यांची जे जे च्या आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी अवैधरित्या नियुक्ती करण्यात आलीय. त्यासंदर्भातील खळबळजनक माहिती मॅक्स महाराष्ट्रच्या हाती लागली आहे.

जे जे स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयात प्राचार्य पदी नियुक्ती करताना मुंबई विद्यापीठाचे काही नियम पाळावे लागतात. पण नियम कोणते आहेत? चला तर जाणून घेऊयात....

जे जे स्कुल ऑफ आर्टमधील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदासाठी आर्किटेक्चरमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी प्रथम श्रेणी असणे आवश्यक आहे.

काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्य पदासाठी काही नियम ठरवून दिले आहेत

आर्किटेक्चरमध्ये पी.एच.डी असावी. तसेच ज्या जर्नलमध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध झाला आहे त्याची किंवा पी.एच.डी शी समकक्ष असलेलं काम ग्राह्य धरण्यात येईल.

15 वर्षे अध्यापन, सराव, पुनर्शोधन याचा अनुभव. ज्यापैकी ५ किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे स्थापत्य शास्त्रात प्राध्यापक म्हणून काम

किंवा

उमेदवार पी.एच.डी नसल्यास अध्यापन, सराव किंवा संशोधनाचा 18 वर्षांचा अनुभव असावा. ज्यापैकी 5 वर्षे आर्किटेक्चर स्तरावर शिकवणे आवश्यक आहे.

जबाबदार प्रशासकीय पदावर काम केल्याचा अनुभव असावा

पात्रता आणि अनुभव

उमेदवाराचा सराव हा आर्किटेक्चरमधील पदवी आणि पदव्यूत्तर यात प्रथम श्रेणीत असावा. पी.एच.डी शी समतुल्य असणाऱ्या कामात 18 वर्षे कामाचा अनुभव असावा. त्यापैकी 5 वर्षे वरिष्ठ स्तराचा समावेश असावा.

प्राचार्य पदासाठी प्रेसिडेंट काऊंन्सिल ऑफ आर्किटेक्चरने घालून दिलेल्या अटी आहेत. पण राजीव मिश्रा यांनी या अटी पूर्ण केल्या आहेत का? यावर टाकूयात एक नजर....

जे जे आर्ट महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा यांचा बायोडाटा...

नाव- मिश्रा राजीव रामफर

वय 45

प्रवर्ग खुला

जन्म तारीख- 27 ऑगस्ट 1966

शैक्षणिक अहर्ता

बॅचलर डिग्री- बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन येथून 1989 मध्ये जी.डी. आर्ट्स 60.58 टक्क्यांसह पदवी

मास्टर्स डिग्री- नाही

पी.एच.डी – 2008 मध्ये एसपीए नवी दिल्ली येथे थेसिस सबमिट केल्याचं म्हटलं आहे.

एम फील- नाही

नेट-सेट- नाही

इतर- शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, पुणे येथून 1992 मध्ये ME Civil (T and CP) 55.5 टक्क्यांसह 2 nd Class ने उत्तीर्ण

यासह इतर माहिती खाली देण्यात आली आहे.



त्यामुळे आता राजीव मिश्रा यांच्या निवडीविषयी काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • राजीव मिश्रा यांचे पदवी किंवा पदव्यूत्तर शिक्षण हे आर्किटेक्चर या विषयात झाले नाही. त्यामुळे राजीव मिश्रा हे अपात्र ठरणे आवश्यक होते.
  • राजीव मिश्रा यांनी बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन या विद्यापीठातून घेतलेल्या डिप्लोमाला 60.58 इतकेच टक्के आहेत. त्यामुळे त्यानुसार निवड समितीने राजीव मिश्रा यांची नियुक्ती केली असेल तरी राजीव मिश्रा यांना प्रथम क्लास नाही तर सेकंड क्लास मिळाला आहे. त्यामुळे पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमात प्रथम श्रेणी असण्याची अट राजीव मिश्रा पूर्ण करण्यात अपयशी ठरतात. मात्र तरीही राजीव मिश्रा यांची प्राचार्य म्हणून निवड कशी केली गेली?
  • राजीव मिश्रा यांनी आपली पी.एच.डी. झाल्याचा दावा केला आहे. मात्र निवड होण्याच्या आधीच्या वर्षीच एसपीए नवी दिल्ली येथे काहीच सादर न केल्याने राजीव मिश्रा यांची पी.एच.डी ची नोंदणी रद्द झाली. त्याचा कबुलीजबाब राजीव मिश्रा यांनी प्रोफेसर बक्षी यांच्या रिपोर्टमध्ये देण्यात आलाय. त्यामुळे पी.एच.डी नसतानाही राजीव मिश्रा यांची नियुक्ती नेमकी कशी करण्यात आली? असे अनेक प्रश्न जे. जे आर्टमधील आर्किटेक्चर विभागाच्या प्राचार्य असलेल्या राजीव मिश्रा यांच्या निवडीबद्दल निर्माण झाले आहेत. त्यामुळे यासंदर्भात आम्ही राजीव मिश्रा यांच्याशी फोनवरून बातचीत केली. त्यावेळी राजीव मिश्रा यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात....

मॅक्स महाराष्ट्रने राजीव मिश्रा यांच्याशी बातचीत केली. यावेळी राजीव मिश्रा यांनी एखादी नियुक्ती झाल्यानंतर दहा वर्षानंतर त्याची बातमी होऊ शकते का? तुम्ही बातमी लावून काय करणार आहात. तुम्हाला काय छापायचं आहे ते छापा, असं म्हणत तुम्ही दहा वर्षानंतर जागे झाला आहात. तुम्हाला काही अक्कल आहे का? असं म्हणत पत्रकाराची अक्कल काढली.

जे जे आर्टमधील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या प्राचार्य पदासाठीचे निकष पूर्ण न करता राजीव मिश्रा या बोगस कलाकाराची निवड निवड समितीने केली आहे. त्यातच राजीव मिश्रा यांनी खोटी माहिती देऊन प्रशासनाची सलग 10 वर्षे फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा बोगस कलाकारावर कारवाई कधी होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 23 Sep 2023 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top