News Update
Home > Election 2020 > जेदयू मंत्रिमंडळात सहभागी नाही

जेदयू मंत्रिमंडळात सहभागी नाही

जेदयू मंत्रिमंडळात सहभागी नाही
X

लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जेडीयूला मंत्रिमंळात स्थान देण्यात आलं नाही. मंत्रिमंडळात फक्त एक जागा देऊ करण्यात आली. मात्र जेडीयूकडून भाजपचा प्रस्ताव फेटाळण्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात जनता दलानं (जेडीयू) मंत्रिपद स्वीकारलं नाही.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात जेडीयुला केवळ एकच मंत्रिपद देण्याचा भाजपतर्फे ठेवण्यात आलेला प्रस्ताव फेटाळलाय. नितीश म्हणाले, “नव्या मंत्रिमंडळात आम्हाला केवळ एकच जागा देणं म्हणजे आमचा नव्या सरकारमध्ये केवळ प्रतीकात्मक सहभाग असल्यासारखे होईल. त्यामुळे आम्ही त्यांना हे मंत्रिपद स्वीकारत नसल्याचं सांगितलं आहे. ही काही मोठी गोष्ट नसून आम्ही आजही पूर्णपणे एनडीएमध्येच आहोत आणि यापुढेही आम्ही एकत्रच काम करणार आहोत, यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही.”

बिहारमध्ये लोकसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली. भाजपला सर्वाधिक १७ तर जेडी(यु)ला १६ जागांवर यश मिळालं. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात केवळ एक जागा देण्याचा प्रस्ताव भाजपतर्फे ठेवण्यात आल्याने जेडीयुने आपल्याला एकही मंत्रिपद नको अशी भूमिका मांडलीय.

Updated : 31 May 2019 5:24 AM GMT
Next Story
Share it
Top