Home > मॅक्स रिपोर्ट > 'तौक्ते' वादळामुळे खान्देशातील हापूस संकटात

'तौक्ते' वादळामुळे खान्देशातील हापूस संकटात

तौक्ते वादळामुळे खान्देशातील हापूस संकटात
X

'तौक्ते' वादळाचा तडाखा कोंकण, मुंबई बरोबर राज्यातील इतर ठिकाणीही बसला आहे. फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. खान्देशचा हापूस आंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमदडे परिसरातील गावरान आमराई तौक्ते वादळाने नुकसान झालं आहे. गेल्या 70 वर्षापासून विविध जातींची आमराई असलेल्या भागांत एका आमराईचं वर्षाला दीड लाखांपर्यंत उत्पन्न येत असे.

अनेक आमराई ह्या भागात आहेत. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंब्याचं नुकसान होत आहे. यंदाही तौक्ते वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. ह्या भागातील काही शेतकऱ्यांचं आंब्यांपासून उत्पन्न मिळतं. मात्र, फळपीक पीक विम्यात येथील आमराई येत नाहीत. कोंकण येथील आंब्याला जशी नुकसान भरपाई मिळते तशीच भरपाई आपल्या आंब्यानाही देण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

Updated : 18 May 2021 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top