Home > Election 2020 > काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी पवार सहमत आहेत का – नरेंद्र मोदी

काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी पवार सहमत आहेत का – नरेंद्र मोदी

काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी पवार सहमत आहेत का – नरेंद्र मोदी
X

काँग्रेसनं लोकसभेसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तरी सहमत आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदिंया इथल्या जाहीर प्रचारसभेत केलं. शरद पवार शांत का बसले आहेत, असा प्रश्नही मोदी यांनी यावेळी उपस्थित केलाय. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या षडयंत्राची योजना असल्याचंही मोदी म्हणाले.

वर्धा इथल्या सभेनंतर आज नरेंद्र मोदींची राज्यातील ही दुसरीच प्रचारसभा गोंदियात पार पडली. नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या कटाचा भाग असल्याची टीका केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करतांना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तरी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सहमत आहेत का हे स्पष्ट करावं, असं आवाहन करत शरद पवार शांत का बसलेले आहेत, असा प्रश्न उपस्थित केलाय.

Updated : 3 April 2019 3:19 PM GMT
Next Story
Share it
Top