Home > मॅक्स रिपोर्ट > जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन करणेसाठी सामूहिक वनहक्क समिती, मजरे जांभुळपाडाचा पुढाकार

जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन करणेसाठी सामूहिक वनहक्क समिती, मजरे जांभुळपाडाचा पुढाकार

जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन करणेसाठी सामूहिक वनहक्क समिती, मजरे जांभुळपाडाचा पुढाकार
X

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असणाऱ्या जांभूळपाडा या गावामध्ये सामूहिक वन व्यवस्थापन समितीची गावसभा काल पार पडली. या गावसभेमध्ये जंगलाचे शाश्वत नियोजन करण्याच्या उद्देशाने रिसोर्स मॅप तयार करण्यात आला. वनहक्क कायदा २००६ नुसार जंगलाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठीचे अधिकार हे गावसमाजाकडे देण्यात आले आहेत. जंगलाच्या सरंक्षण आणि व्यवस्थापनामध्ये जनसमूहांचा कृतिशील सहभाग मिळवणे हा या अधिकार हस्तांतरणामागील उद्देश आहे.

“जंगले टिकवायची असतील तर त्यांचे शास्त्रीय नियोजन करणे गरजेचे आहे. शास्त्रीय नियोजनाशिवाय जंगलांचा शाश्वत सांभाळ करता येणे शक्य नाही. म्हणूनच आम्ही आमच्या गावाला वनहक्क कायदा २००६ अंतर्गत मान्य झालेल्या सामूहिक वनहक्क क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी गाव सभेचे आयोजन करुन जंगलाचा रिसोर्स मॅप तयार केला आहे. याद्वारे भविष्यात जंगलांचे नियोजन करण्यासाठीचे मुर्त स्वरुपातील चित्र गावसमाजासमोर मांडले आहे. अशी प्रतिक्रिया सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती मजरे जांभूळपाडाचे सचिव सुभाष जाधव यांनी दिली आहे.

वनहक्क कायदा २००६ चे कलम ३(१) अंतर्गत मजरे जांभुळपाडा या गावाला २०१९ साली सामुहिक वनहक्काचे आधिकार प्राप्त झाले आहेत. या हक्काअंतर्गत गावाच्या सीमांतर्गत किंवा सिमाबाहेर पारंपारिक रित्या गौण वनउपज गोळा करणे, त्यांचा उपयोग, संग्रह व विक्री करनेसाठी स्वामित्वाचा आधिकार देण्यात आले आहेत. परंतु, वनहक्क कायदा २००६ नुसार जसे अधिकार देण्यात आले आहेत तसेच वनहक्क धारकांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची निश्चिती देखील करण्यात आली आहे. वनहक्क कायदा २००६ चे नियम ५ नुसार प्रत्येक वनहक्क धारकांना जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन करणे बंधन केले आहे.

“राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचा कमीत कमी 33 टक्के भूभाग वनाच्छादनाखाली असणे अभिप्रेत आहे. सध्या महाराष्ट्रभरात केवळ 16 टक्के क्षेत्र वनाच्छादाखाली आहे. त्यातही चांगले आणि मध्यम दर्जाचे वनाच्छादन फक्त 9.6 टक्के क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे. सध्याच्या विकासाच्या प्रकल्पांसाठी वनांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात हस्तांतरित केले जाते. त्यामुळे वनांचे संरक्षण व संवर्धन हे शास्त्रीय व सूक्ष्म नियोजनाशिवाय शक्य नाही. आणि हे सूक्ष्म नियोजन स्थानिक लोकसमूदायांच्या कृतिशील सहभागा शिवाय होऊ शकत नाही”. असे मत राहुल सावंत, लिड- प्रोग्राम आणि कँपेन्स, वातावरण फाऊंडेशन यांनी मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “सरकारच्या ताब्यात असणारी जंगले शाश्वत नियोजन व व्यवस्थापनासाठी गवसमजला खुली कारणे ही या वनहक्क कायद्यातील क्रांतिकारी भूमिका आहे”.

आम्ही केलेल्या नियोजनामुळे गावातील स्थलांतर रोखले जाणार असून स्थानिक जागेवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आम्हाला गाव सोडून परमुलखाला जाण्याची गरज पडणार नाही. आम्ही गावात राहिल्यामुळे आमच्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळणार आहेत. आमच्या दैनंदिन आयुष्यात स्थिरता मिळण्यासाठी आम्हाला ही चालून आलेली संधी आहे. ती आम्ही वाया जाऊ देणार नाही. आम्ही आजपर्यंत जंगले सांभाळली आहेत आणि इथून पुढेही सांभाळणार आहोत असे मत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडाचे अध्यक्ष अनंता वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षभरापासून वनव्यवस्थापनासाठी लोकसहभाग मिळवणे करीता वातावरण फाऊंडेशनच्या वतीने सुधागड तालुक्यातील १७ गावांमध्ये काम सुरू आहे. काम करत असलेल्या सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त मजरे जांभूळपाडा या गावाच्या सामूहिक वनहक्क क्षेत्रामध्ये दिनांक ४ नोहेंबर २०२३ रोजी स्थानिक सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, वन विभाग व वातावरण फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या शिवारफेरी दरम्यान शाश्वत वनीकरणाचे धेय्य गाठण्यासाठी मजरे जांभूळपाड्याच्या जंगलामध्ये जल व मृदा संधारणाची कामे केली जाऊ शकणाऱ्या वन क्षेत्रांची निश्चिती करुन त्या वन क्षेत्रांवरील शास्त्रीय उपचारांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या शिवार फेरी दरम्यान मिश्र वृक्ष लागवड, बांबू लागवड, वनतलाव, सिमेंट नाला बांध, गॅबियन बंधारा, लुज बोल्डर स्ट्रक्टर्स (एलबीएस), जाळ रेषा आणि रोपवाटीका तयार करणे अशा कामांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या कामांची ठिकाणे आणि कामे या रॉसर्स मॅप वर दर्शवण्यात आली आहेत.

जंगलांच्या शास्त्रीय व्यवस्थापना करिता सुक्ष्म नियोजन करणारी कृती संपूर्ण रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभुळपाडा म्हणजे आम्ही केली आहे. अशीच आदर्शवत भूमिका जिल्ह्यातील इतर सामूहिक वनहक्क प्राप्त गाव समाजानेही घ्यावी असे आवाहन मजरे जांभूळपाडा ग्रामसभेच्या खजिनदार भारती पवार यांनी केले आहे.

सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा, यांनी सामूहिक वन हक्क क्षेत्रात घेण्यात येणारे भविष्यातील नियोजनाचे प्रतिचित्र जमिनीवर रेखाटले. मजरे जांभूळपाडा मधील सर्व ग्रामस्थांनी जमिनीवर संसाधन नकाशा काढला यामध्ये जंगल संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन कशा प्रकारे करण्यात येणार याचे चित्र रेखाटले व सामूहिक वन क्षेत्रात असलेल्या ठिकाणची स्थानिक मान्यतेची नावे या नकाशामध्ये दिलीगेली आहेत., तसेच पूर्वी पासून असणाऱ्या वाटा / पायरस्ते दाखवले गेले व वृक्षरोपण कुठे करण्यात येणार आहे हे दाखवले आहे. यातून असे सिद्ध होते कि मजरे जांभूळपाडा सामूहिक वन क्षेत्र प्रत्येक सदस्याला त्यांच्या मौल्यवान जंगलाचे संरक्षक बनवते व मोठया उत्साहाने जंगलाचे व आपले नाते ते दाखवत होते. तसेच सामूहिक वन हक्क क्षेत्रामध्ये असणारे वृक्ष आणि वृक्षारोपण विविध भागात करण्यात येणारी इतर कामे , करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी शाश्वत पाणीपुरवठा करणेसाठी दोन वनतलाव खोदण्यात येणाऱ्या जागा, बंधारे, यांचा समावेश करण्यात आला आहे

हा रिसोर्स मॅप तयार करण्यासाठी आदिवासी वाडीतील महिला, पुरुष,मुले व वयोवृद्ध जानकार उपस्थित होते. तसेच हिरडे, यांनी तांत्रिक सहाय्य पुवले

Updated : 17 Dec 2023 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top