Home > मॅक्स रिपोर्ट > सणासुदीत पेट्रोल-डिझेलवाढीमुळं महागाईचा भडका

सणासुदीत पेट्रोल-डिझेलवाढीमुळं महागाईचा भडका

सणासुदीत पेट्रोल-डिझेलवाढीमुळं महागाईचा भडका
X

सणासुदीच्या दिवसात बाजारपेठेत खरेदीसाठी मुस्लिम आणि हिंदू बांधवांची खरेदीसाठी गर्दी दिसत असली तरी खरेदी मंदावली आहे. सणासुदीवर वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा परिणाम झाला असून पूर्वी कमी किंमतीत मिळणाऱ्या वस्तू आता वाढत्या इंधनदरवाढीनं सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. पूर्वी सणासाठी लोक जास्त प्रमाणात वस्तूंची खरेदी करत होते,पण वाढत्या महागाईमुळे लोक मर्यादित वस्तूंची खरेदी करत असल्याचे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले, प्रतिनिधी अशोक कांबळेचा रिपोर्ट

रमजान ईद सणाच्या खरेदीसाठी मीना बाजारात लोकांची गर्दी

रमजान या पवित्र महिन्याची सुरुवात 2 एप्रिलपासून सुरू झाली असून शेवटचा दिवस 2 मे रोजी आहे. चंद्र इस्लामिक कॅलेंडर (रमजान / रमजान 2022) नुसार रमजानची तारीख निश्चित केली आहे. रमजानची सुरुवात चंद्राला म्हणजेच हिलालकडे पाहून होते. या महिन्यात लोक उपवास करतात. उपवासाला अरबीमध्ये सौम आणि मह-ए-सियाम म्हणतात. पण पर्शियनमध्ये त्याला रोजा म्हणतात. या संपूर्ण महिन्यात लोक रोजा (रोजा) ठेवतात. दररोज उपवासात सूर्योदयापूर्वी काही अन्न असते ज्याला सहारी म्हणतात आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर उपवास मोडला जातो, त्याला इफ्तारी म्हणतात. ते रात्री प्रार्थना करतात. तसेच, ते कुराण म्हणजे पारायण पाठ करतात. रमजानचा महिना ते देवाचे आभार मानून घालवतात. या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते आणि संध्याकाळी आपल्याला चंद्र दिसतो. ईद दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.





मिना बाजारात लागले वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल

सोलापूरचा मीना बाजार प्रत्येक वर्षी रमजान ईद च्या निमित्ताने भरला जातो. या ठिकाणी ड्राय फ्रुट,कपड्याचे स्टॉल,चपलांचे स्टॉल, आभूषणाचे स्टॉल, खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल, वेगवेगळ्या पापडाचें स्टॉल असल्याने याठिकाणी सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम बांधव खरेदीसाठी येतात. ईद च्या सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करतात. सणासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने याठिकाणी गर्दी होते. या बाजाराला पोलीस आयुक्त तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली होती.

महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना आरिफ कुमठेकर या व्यापाऱ्यांनी सांगितले, की पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. खाद्य तेलांच्या किंमती वाढल्याने रमजान च्या उपवासासाठी लागणाऱ्या खाद्य पदार्थांच्या किंमतीत वाढ झाली असून पूर्वी ग्राहक किलो,अर्धा किलो माल घेत होते,ते सध्या कमी प्रमाणात माल घेत आहेत. सध्या लोक कमी पैशात ईद साजरी करत आहेत. लॉकडाऊन च्या दोन वर्षामध्ये लोकांना काही भेटले नाही. तरीपण बाजार चांगल्या प्रकारे भरला आहे. पूर्वी लोकांची मालाला जास्त प्रमाणात मागणी होती, ती आता कमी प्रमाणात आहे. तरीही लोक कमी पैशात सण साजरा करत आहेत. वस्तूंच्या किंमती वाढल्याने लोकांचे खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. जे ग्राहक किलोने माल घेत होते ते आता सव्वाशे ग्रॅम, पाव किलो,छटाक माल घेत आहेत. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते माल खरेदी करू लागले आहेत. ज्यांची परिस्थिती नाजूक आहे ते महागाईने हैराण आहेत. जे करून खाणारे लोक आहेत. त्यांच्यावर महागाईचा परिणाम झाला आहे. ट्रान्सपोर्टचे भाडे वाढले असल्याने ईद सणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती ही वाढल्या आहेत. बाजारामध्ये जो माल 800 रुपयांना मिळत होता,तो आता 1600 रुपयांना मिळू लागला आहे. काजूचे पहिली किंमत 800 रुपये किलो होती,ती आता 1 हजार रुपये किलो झाली आहे. यामध्ये 200 रुपये भाव वाढ झाली आहे. बदामाचे दर वाढले असून 700 रुपये किलोने मिळणारे बदाम आता 900 रुपये किलोने मिळत आहे. सर्व वस्तूंमध्ये 400 ते 500 रुपयांनी भाव वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती वाढल्याने हे सर्व झाले आहे.





अक्षय्य तृतीय्या आणि रमजान ईद सण महागाईच्या छायेत

राज्यात रमजान ईद आणि अक्षय्य तृतीय्या चा सण साजरा केला जात आहे. या दोन्ही सणावर महागाईचे सावट असून लोक सण साध्या पध्दतीने साजरा करत आहेत. असे असूनही लोकांमध्ये सणाच्या वस्तूंच्या खरेदीसाठी उत्साह आहे. किराणा दुकाने आणि इतर दुकानात खरेदीसाठी लोकांची गर्दी झाल्याचे दिसते. अक्षय्य तृतीय्या च्या सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तर रमजान ईद च्या सणाला सुरकुरमा केला जातो. यामध्ये दूध हा पदार्थ महत्वाचा असून यात बदाम,काजू,साखर टाकली जाते. हा सुरकुरमा समाजातील सर्वच स्थरातील लोकांना पिण्यासाठी मुस्लिम बांधव बोलवत असतात. हे दोन्ही सण हिंदू आणि मुस्लिम मोठ्या एकोप्याने साजरा करतात. अक्षय्य तृतीय्या च्या सणाला हिंदू बांधव मृत झालेल्या व्यक्तीला नैवैद्य दाखवतात. यासाठी मृत व्यक्तीला आवडणाऱ्या खाद्य पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. हा घरावरही ठेवतात. त्यासाठी कावळ्याची वाट पाहिली जाते. हा सण ग्रामीण भागात आणि शहरी भागात ही साजरा केला जातो. रमजान ईद आणि अक्षय्य तृतीय्या या दोन्ही सणावर जरी महागाईचे संकट असले तरीही नागरिक सण साजरा करताना दिसत आहेत.

रमजान ईदला मुस्लिम बांधव पडतात सामूहिक नमाज

मुस्लिम बांधव रमजान ईदच्या सणाला सामूहिक नमाज पडतात. यादिवशी मुस्लिम बांधव नवीन कपडे घालतात. एकमेकांची गळा भेट घेतात. इतर समाज बांधव ही या दिवशी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात. या दिवशी मुस्लिम बांधव इतर धर्माच्या बांधवांना आपल्या घरी सुरकुरमा खाण्यासाठी बोलवतात. या रमजान ईद च्या सणांमध्ये हिंदू बांधवही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

Updated : 3 May 2022 10:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top