धक्कादायक: भारत महिलांसाठी असुरक्षीत...
X
बेटी बचावचा नारा देणा-यांचे पितळ उघडे केले आहे ते एका जागतीक सर्व्हेक्षणाने. भारत महिलांसाठी असुरक्षीत आहे हे सांगतय जागतीक स्तरावरील सर्व्हेक्षण.
५५० तज्ञांनी मिळून महिला विषय जागतीक सर्वेक्षण केले तेव्हा भारत हा महिलांसाठी सर्वात मोठा असुरक्षित देश आहे हे त्या सर्व्हेक्षणातुन समोर आले आहे. घरगुती हिंसाचार, बलात्कार, लैंगिक शोषण याबरोबर हत्या व ॲसिड अटॅक अशा गुन्ह्यांमध्ये ही वाढ झाल्याचे या सर्व्हेक्षणात म्हटले आहे. दररोज किमान १०० महिला शोषणाच्या गुन्ह्यांची नोंद केली जाते २०१६ मधील नॅशनल क्राईम रेकॅर्डनुसार वर्षाला ३९,००० महिलांवरील हल्ल्याच्या नोंदी आहेत म्हणजेच १२% ने महिला अत्याचारात वाढ झालेली दिसुन येत आहे. सात वर्षापुर्वी केल्या गेलेल्या याच सर्व्हेक्षणात भारत चौथ्या क्रमांकावर होता आणि आता तो प्रथम क्रमांकावर आहे ही खरतर लज्जास्पद बाब आहे.