Home > मॅक्स रिपोर्ट > यवतमाळमध्ये महिलेने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला

यवतमाळमध्ये महिलेने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला

यवतमाळमध्ये महिलेने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला
X

यवतमाळमधील एका महिलेने चार मुलींना जन्म दिला आहे. यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राणी प्रमोद राठोड नावाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलींना जन्म दिला. मुली आणि त्यांची आई सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

राणी राठोड या महिलेला 25 जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान डॉक्टरांनी काळजी घेण्यासाठी या महिलेला येथे थांबण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून पती-पत्नी दोघेही रुग्णालयात राहात होते.

आज रविवारी दुपारी 12.30 वाजता चार मुलींना महिलेने जन्म दिला. महिलेची डिलिव्हरी सामान्य झाली आहे, तसंच आई आणि मुली सुखरुप आहेत.

Updated : 26 Aug 2018 6:22 PM IST
Next Story
Share it
Top