Home > Election 2020 > २०१४ मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात अशा होत्या लढती

२०१४ मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात अशा होत्या लढती

२०१४ मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात अशा होत्या लढती
X

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याची निवडणूक ११ एप्रिल झाली असून विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीसाठी येत्या १८ एप्रिल ला महाराष्ट्रातील बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात १० जागांपैकी हिंगोली आणि नांदेड या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या आणि उर्वरित ८ जागा युतीने जिंकल्या होत्या.

यामध्ये २०१४ मध्ये बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या टप्प्याच्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर क्रमशः अशी आहे :

बीड : या मतदार संघात ६८.७५% मतदान झालं होतं. यावेळी भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांना ६ लाख ३५ हजार ९९५ मतं पडली होती. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या सुरेश धस यां ४ लाख ९९ हजार ५४१ मतं पडली होती. या लढतीत भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे १ लाख ३६ हजार ४५४ मतांनी विजयी झाले होते.

सोलापूर : या मतदार संघात ५५.५८% मतदान झालं होतं. यामध्ये भाजपचे उमेदवार शरद बनसोडे आणि काँग्रेस चे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आमने सामने होते. या लढतीत शरद बनसोडे यांनी दीड लाख मतांनी पराभव केला होता. यामध्ये बनसोडे यां ५ लाख १७ हजार ८७९ मतं पडली होती तर सुशीलकुमार शिंदे यांना ३ लाख ६८ हजार २०५ मतं पडली होती. मात्र यावेळी येथे तिहेरी लढत होत असून सुशीलकुमार शिंदेंन समोर मोठं आव्हान असून आता भाजप मधून जयसिद्धेश्वर स्वामींना तिकीट दिलं आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर इथून लढत आहेत.

नांदेड : या मतदार संघात ६०.११% मतदान झालं होतं. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ८१ हजार ४५५ मतांनी विजयी झाले होते. दरम्यान अशोक चव्हाण यांना यावेळी ४ लाख ९३ हजार ७५ मतं पडली होती तर भाजपचे उमेदवार डी.बी . पाटील यांना ४ लाख ११ हजार ६२० मतं पडली होती. अखेर अशोक चव्हाण इथून पुन्हा लढत आहेत तर भाजपचे उमदेवार प्रतापराव चिखलीकरांचं आव्हान आहे .

हिंगोली : या मतदार संघात ६६.२९% मतदान झालं होतं. या लढतीत काँग्रेसचे राजीव सातव १६३२ मतांनी विजयी झाले असून राजीव सातव यांना ४ लाख ६७ हजार ३९३ मतं तर शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंना ४ लाख ६५ हजार ७६५ मतं पडली होती. यंदा सातव या निवडणुकीतून बाहेर असून शिवसेनेचे सुभाष वानखेडें हे काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत.

उस्मानाबाद : या मतदार संघात ६३.६५% मतदान झालं होतं. शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांना ६ लाख ७ हजार ६९९ मतं पडली होती तर राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांना ३ लाख ७३ हजार ३७४ मतं पडली होती. यामध्ये रवींद्र गायकवाड हे २ लाख ३४ हजार ३२५ मतांनी विजयी झाले होते.

लातूर : या मतदार संघात ६२.६९% मतदान झालं होतं. भाजपचे डॉ सुनील गायकवाड़ २ लाख ५२ हजार ३३ मतांनी विजयी झाले. त्यांना ६ लाख १४ हजार ५५७ तर काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांना ३ लाख ६२ ५२४ मतं पडली होती.

परभणी : या मतदार संघात ६४.४४% मतदान झालं होतं. शिवसेनेच्या बंडू जाधव यांना ५ लाख ७८ हजार ६७ मतं पडली होती. तर राष्ट्रवादीचे विजय भाबळें यांना ४ लाख ५१ हजार १०८ मतं पडली होती. यामध्ये बंडू जाधव हे १ लाख २६ हजार ९५९ मतांनी विजयी झाले होते.

अकोला : या मतदार संघात ५८.५१% मतदान झालं होतं. यामध्ये भाजपचे संजय धोत्रे २ लाख ३ हजार ११६ मतांनी विजयी झाले असून त्यांना ४ लाख ५६ हजार ४७२ मतं पडली होती. तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ मतं पडली होती . तर भारीप बहुजन संघाचे प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ३८ हजार ७७६ मतं पडली होती. यावेळीदेखील या तिघांमध्ये तिहेरी लढत होणार आहे.

अमरावती : या मतदार संघात ६२.२९% मतदान झालं होतं. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ १ लाख ३६ हजार ८०७ मतांनी विजयी झाले होते. त्यांना एकूण ४ लाख ६५ हजार ३६३ मतं पडली होती. तर राष्ट्रवादीकडून नवनीत राणा ३ लाख २८ हजार ५५६ मतं पडली होती. यंदा देखील हीच लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे.

बुलढाणा : या मतदार संघात ६१.३५% मतदान झालं होतं. शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना ५ लाख ९ हजार १४५ मतं पडली होती. तर राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे यांना ३ लाख ४९ हजार ५३४ मतं पडली होती. प्रतापराव जाधव हे १ लाख ५९ हजार ५७९ मतांनी विजयी झाले होते.

मात्र यंदाच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत.

Updated : 16 April 2019 7:31 AM GMT
Next Story
Share it
Top