Home > Election 2020 > बुलढाणा मतदारसंघात ‘या’ ठिकाणी होणार फेरमतदान

बुलढाणा मतदारसंघात ‘या’ ठिकाणी होणार फेरमतदान

बुलढाणा मतदारसंघात ‘या’ ठिकाणी होणार फेरमतदान
X

बुलढाणा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे. या संदर्भात राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी 21 एप्रिलला एक पत्र जारी केले असून या पत्रानुसार बुलडाणा लोकसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या 25 – मेहकर विधानसभा मतदारसंघामधील डोणगांव येथील 120 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार आहे. सदर केंद्रावर 24 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत फेरमतदान होणार आहे.

हे आहे कारण?

या केंद्रावर 18 एप्रिल रोजी मतदान पथकाकडून मॉक पॉल केल्यानंतर कंट्रोल युनीटमधील डाटा क्लीअर न केल्याने व काही मतदान झाल्यावर डाटा क्लिअर केल्याने या केंद्रावर फेरमतदान होत आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.

Updated : 21 April 2019 4:06 PM GMT
Next Story
Share it
Top