Home > मॅक्स रिपोर्ट > जळगाव जिल्ह्यात दलित मुलांना नग्न करून मारहाण

जळगाव जिल्ह्यात दलित मुलांना नग्न करून मारहाण

जळगाव जिल्ह्यात दलित मुलांना नग्न करून मारहाण
X

सध्या सोशल मीडिया वरती एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये काही लोक मुलांना नग्न करून निर्दयीपणे मारत आल्याचे दिसून येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीड आणणारी ही घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावातील असून ही मुलं दलित असून विहिरीवर आंघोळीसाठी गेली असता त्यांना गावातीलच काही लोकांनी नग्न करून मारहाण केली आणि नंतर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

सदर व्हिडीओमध्ये तीन मुलांना काठी आणि पट्याने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मुलांनी स्वतःच नग्न शरीर झाकण्यासाठी झाडाच्या पाल्याचा उपयोग केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विहीरीवर अंघोळ केली, या शुल्लक कारणावरून नग्न करून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात असून ही मुलं दलित अाहेत म्हणूनच या मुलांना मारहान झाली, अशी चर्चा पंचक्रोशीत सुरु आहे.

Updated : 14 Jun 2018 11:08 AM GMT
Next Story
Share it
Top