Home > मॅक्स रिपोर्ट > एका दिवसात एक क्विंटलच्या चपात्या...

एका दिवसात एक क्विंटलच्या चपात्या...

भारत जोडो यात्रेत हाजारो लोक सहभागी होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांच्या जेवणाचे नियोजन यात्रेत कश्याप्रकारे करण्यात आले आहे? कँम्प एक, कँम्प दोन, कँम्प तीन मध्ये कुणाला दिला जातो प्रवेश, लोकांसाठी दुसऱ्यादिवशी जेवण बनवण्यापूर्वी एक दिवस अगोदर कशाप्रकारे जेवण तयार केले जातं हे जाणून घेण्यासाठी वाचा अजिंक्य आडके यांच्या स्पेशल रिपोर्ट

X

कन्याकुमारी पासून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ६३ दिवसांचा प्रवास करून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यापर्यंत पोहचली... या यात्रेत हजारो लोकांचा सहभाग असून मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायाला मिळतं आहे, परंतू या सगळ्या लोकांच्या जेवणाची देखील नियोजन योग्य प्रकारे करण्यात आले असून दुपारच्या विश्रांतीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले दहा हजार लोकांचे जेवण बनवले जाते. त्यामुळे कॅम्प एक , कॅम्प दोन व कॅम्प तीन असे तीन कॅम्प मध्ये लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कॅम्प एक मध्ये राहुल गांधी व त्यांच्यासोबत असलेली टीम असते तर कॅम्प दोन मध्ये ज्यांच्याकडे पासेस आहेत असे लोक तर कॅम्प तीन मध्ये सर्व यात्रेत सहभागी झालेल्या लोकांची दुपारच्या जेवणाची सोय केली जाते.

लोकांच्या जेवणासाठी प्रत्येक ठिकाणी जवळपास शंभर लोक काम करत असून..दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी करण्यापूर्वी एक दिवल आधीच रात्री जेवण बनवायला सुरवात केली जाते या मध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. सहभागी झालेल्या लोकांना पोटभर जेवण देण्यासाठी त्या दिवसरात्र काम करत असतात.जेवण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नियोजन दुसऱ्या टीमकडे असते. लोकांना पिण्यासाठी गार व साध्या पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या लोकांसाठी अश्याप्रकारे जेवणाची सोय करण्यात आली आहे.

ही यात्रा पुढे कश्मीर पर्यंत जाणार आहे. यात्रेत दररोज नवीन अनेक लोक सहभागी होतील त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचे नियोजन हि आधीचं केले जाते.


Updated : 14 Nov 2022 5:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top