Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : ED आणि पेनड्राईव्हच्या पलीकडचा महाराष्ट्र

Ground Report : ED आणि पेनड्राईव्हच्या पलीकडचा महाराष्ट्र

राज्यात सध्या केवळ ED आणि पेनड्राईव्हची चर्चा आहे....सर्व प्रसारमाध्यमांमध्ये सध्या हाच विषय गाजतो आहे. पण यामध्ये राज्याच्या जनतेला कितपत रस आहे? पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, वाढती महागाई यावर कुणीच काही बोलत नाहीये....प्रत्यक्षात राज्यातील जनता कोणत्या समस्यांशी संघर्ष करत आहे, सत्ताधारी आणि विरोधकांना सामान्य शेतकऱ्यांचे काय सांगणे आहे, याचा आढावा घेणारा हरिदास तावरे यांचा रिपोर्ट....

Ground Report : ED आणि पेनड्राईव्हच्या पलीकडचा महाराष्ट्र
X

लाल बहादुर शास्त्री यांनी घोषणा केली होती जय जवान जय किसान जवान झाला देशाच्या सीमेवर जवान आहेत म्हणून आम्ही इथे राहतो पण आमच्या जीवावर हे सगळे जगतात...! लाईट देतात 4 तास आणि घेतात 24 तासाचे लाईट बिल...!

शेतकरी हा आपल्या शेतामध्ये ऊन वारा पाऊस याची कसलीही परवा न करता शेतकरी आपल्या शेतात राबराब राबत असतो .त्याला अतोनात कष्ट सहन करावे लागत आहेत. त्यातच अचानक येणारा पाऊस पावसामुळे शेतीचं होणारे अतोनात नुकसान सहन करत असतो. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी हतबल होत चालला आहे.

त्यातच राज्यामध्ये काही दिवसापासून पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. दररोज वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीवर होत असताना पाहायला मिळत आहे. एकीकडे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ट्रॅक्टर सह अनेक यंत्राचा वापर आपल्या शेतीमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच शेतकऱ्याकडे बैल नसल्यामुळे शेतकरी हा ट्रॅक्टरवर अवलंबून असल्याचे शेतकरी सांगत आहेत .कारण बैल विकत घेऊन सांभाळणं अवघड झाला आहे. त्याचबरोबर जमिनीचे तुकडीकरण (विभाजन)झाल्यामुळे शेतकऱ्यांना बैल पाळणा सोपं राहिलं नाही. त्यामुळे शेतकरी आता बैल न पाळता आपली शेती ट्रॅक्‍टरच्या साह्याने करत आहे.

याविषयी ट्रॅक्टर मालक सांगत आहेत की गेल्या वर्षी ज्वारी 150/ प्रतिक्विंटल ,गहू 300/ प्रतिक्विंटल, मका 400/,बाजरी 150/प्रति क्विंटल काढायचं मात्र यावर्षी डिझेलचे भाव वाढल्यामुळे मळणी यंत्राचे भाव वाढवले. आता आम्ही ज्वारी, बाजरी 200/, गहू मका 400/प्रतिक्विंटल काढत आहोत डिझेलचे भाव वाढल्यामुळे आम्हाला परवडत नाही .डिझेल जर असे प्रत्येक दिवशी तुम्ही वाढवत गेला तर आम्ही पुढच्या खळ्या ला कसं खळं काढायचं कारण पहिल्या वेळेस कमी कमी दरामध्ये त्यांचा माल तयार केलेला असतो. मात्र पुन्हा आम्ही जर दर वाढवले तर शेतकरी विचारतात की दोन चार दिवसांपूर्वीच तुम्ही या भावाने काढलं आणि आज पुन्हा वेगळा भाव त्यामुळे आम्ही सुद्धा अडचणीत सापडलो आहोत. आता तुम्ही सांगा आम्ही दहा-बारा लाखाच्या वस्तू घ्यायच्या आणि त्या फेडायच्या कशा शासनाने विचार करायला पाहिजे .त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे असं जर चालत राहिले तर लहानसान शेतकऱ्यांनी कसं पोट भरायचं.? दर वेळेस असच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले तर असं चालत राहिला तर कसं व्हायचं आम्ही आमच्या मुलांची शिक्षण कसे करायचे आमच्या मुलीचे लग्न आलेले आहेत. असे जर तुम्ही भाव वाढत राहिले तर आम्ही आमच्या मळणी यंत्र आतून शेतकऱ्याचा माल कसा काढायचा व त्यातून आम्हाला उत्पन्न कसा राहायचं खळे लहान झाल्यामुळे आम्हाला येण्या-जाण्यासाठी दोन लीटर डिझेल लागत आहे. तर खाण्यासाठी एक लिटर डिझेल लागत आहे त्यामुळे करावं हा प्रश्न आमच्यापुढे पडला आहे तुम्ही सर्वांनी व मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी जगावं कसं? दुसरीकडे विहीर खोदायला गेला तर विहिरीला पाणी सुद्धा लागत नाही आम्ही असे छोटे-मोठे धंदे करतो. तर यामध्ये आम्हाला परवडत नाही खळे संपले की आम्ही ट्रॅक्टर नांगर टी साठी चालू करत असतो मात्र गेल्या वर्षी(1200) बाराशे रुपये प्रमाणे नांगरट केली (700) रुपये याप्रमाणे पाळी घातली तर आता यावर्षी नांगरट (1500)पंधराशे रुपये देऊन सुद्धा परवडत नाही. आणि पाळी (1000 )रुपये प्रति एकर प्रमाणे केली आहे या वर्षी शेतकरी आता अडकूत्यात यायला लागले आहेत. त्यामुळे सांगावं कुणाला की नाही ईकडे पेट्रोल डिझेलचे भाव एकादिवसा आड वाढत आहेत. त्यामुळे आता शेतकरीच तरी काय चुकत आहे आम्हालाही ठाम राहून कोणतं काम करायला येत नाही .कारण प्रत्येक येत दोन दिवसाला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत .त्यामुळे आता आम्ही आमचे धंदे करायचे कसे व शेतकरी सुद्धा यामुळे अडचणीत सापडला आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर ठाम निर्णय घ्यावा शेतकऱ्यांपुढे फार मोठ्या अडचणी आहेत. एकतर कापसाला भाव नाही यावर्षी भाव मिळाला तर 2-2 माल निघाला यावर्षी कापसाला भाव फक्त पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस लावा म्हणून तर दिला नसेल ना.? पुन्हा एकदा शेतकरी पुढच्या वर्षी शेतकरी फाशी घेऊन मारतो म्हणायचं सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने निर्णय घ्यावा असे ट्रॅक्टर मालक शिवचरण मस्के म्हणाले.

शेतकऱ्याने आणि धंद्या वाल्यांना कसं वागावं हेच कळत नाही धंदेवाले ही तसेच अडचणीत आणि शेतकरी ही पेरणीसाठी खत बी व इतर खर्च मिळून वीस हजार रुपये पर्यंत खर्च झाला आहे इतके माणसं राबवुन.. इतका खर्च करून त्याच्यामध्ये ज्वारी दोन तीन हजाराची होती का नाही थोडा खर्च करून खर्च करून... शेतकऱ्यांनी तरी कुठपर्यंत कष्ट करावे औतबारदाण्याला वैरण पुराना व ट्रॅक्टर वाल्याला डिझेल मुळे पुराना शेतकऱ्यांची मरण आणि धंद्यावाल्या चे ही मरण आले आहेत गरिबांच्या लेकराला नोकऱ्या तर नाहीतच पण शिक्षण पण नाही शेतकऱ्याच्या लेकराला कोणी नौकरीला लावत नाही कष्ट शेतामधी कराव तर वैरणी मुळे म्हशी विकण्याची पाळी आली आहे यामुळेच शेतकऱ्यांना परवडत नाही यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहे यावर्षी तर मोठी अडचण निर्माण झाली आहे यावर्षी तर जनावरांना टाकण्यासाठी वैरण नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कसं जगावं आणि कसं खावं... शेतं पिकवायचे की नाही शेतकऱ्याला जगून द्यायचा आहे की मारायचं आहे आता तुम्हीच ठरवा..? नाही खत बी घालावं तर काहीच येणार नाही नाही नांगरट डोंगरट करावी तर काहीच येणार नाही...वाचायचं तरी कसं शेतकऱ्यांनं.. तुम्हीच ठरवा शेततळे पिकवायचे आहेत की नाही माल काढायचे आहेत की नाही.. आमचं तर आता सार खुतलं आहे काय करावं म्हणून आम्हाला कळत नाही.. शेती करावीच कशी हेच आम्हाला कळत नाही... असे महिला शेतकरी मीरा संताराम मस्के म्हणाल्या.

शेतामध्ये काही परवडत नाही आमची खायाची पंचायत व्हायला लागली आहे .थोडेफार आलं तर त्यालाही डुकरं खाऊन जातात लायटी वाल्यांनी तर आमची पार...हो एकतर चार नाही तर दोन तास लाईट देतात आणि 24 तासाचा बिल मागत आहेत .ते पण आता कुणाच्या बापाचा भरायचं... सरकार असं दुभंगली झालेलं आहे त्यामुळे आम्ही आता फार वैतागून गेलो आहोत एक तर जनावरांना खायला कडबा नाही. जनावरांचे भाव गगनाला भिडले आहेत... दुधाला चाळीस आणि पन्नास रुपये भाव मिळत आहे... एक म्हैस घ्यायची म्हणलं तर (70/80)सत्तर ते ऐंशी हजार रुपये लागत आहेत राखा चे भाव जर पाहिले तर 55 आणि 60 रुपये कसं काय त्याच्यात व्यवसाय करायचा कोणता... शेतीला तर जोडधंदा असल्याशिवाय काहीच होत नाही.. वरून जे काही येत आहे ते पण पुरत नाही द्यायला पण कोणी काय रिकामा नाही नुसतच सांगतात आम्ही देतो आणि ते देतो..

फुकट गॅस दिले हो या सरकारने आणि भरायला आता एक हजार रुपये वसुल करायला लागले.. काय फुकट दिलं यांनी.. करून घेणार आहात शेतकऱ्यांकडून शेतकऱ्या सारखा दिलदार राजा तुम्हाला या जगात कोणीही भेटणार नाही. लाल बहादुर शास्त्री यांनी घोषणा केली होती जय जवान जय किसान जवान झाला देशाच्या सीमेवर जवान आहेत म्हणून आम्ही इथे राहतो पण आमच्या जीवावर हे सगळे जगतात याचं काय करायचं... आमची जर पोटाची खळगी भराना तर तुमच्यासाठी आम्ही काय पिकवावं... काहीतरी शासनाने आम्हाला द्यावेत काही उपाय योजना होत असतील तर सरकारने कराव्यात.. काहीतरी सवलती द्याव्यात तर आम्ही काही तरी करू शकतो तुमच्या होत नसेल तर तुम्ही सांगा शेतकरी राजाला की तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा मग आम्ही ठरवू आम्हाला काय करायचं आहे ते गळफास घेतला की झालं काम आमचं याच्यापेक्षा काय प्रतिक्रिया द्याव्यात शासनाला.. पाणी नसल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही आणि उत्पन्न निघत नाही उत्पन्नात घट येत आहे जगणं मुश्किल झालंय आता आमचं.. शेवटची पायरी शिल्लक राहिली आहे खरंच ना आता वैतागुन गेलाय जीव आता..

आपला देश डिजिटल होतोय चंद्रावर नाही इंद्रा पर्यंत गेलाय इंद्र सभे पर्यंत जा... पण भाकरी पिकवणारा शेतकरी अजूनही तोच आहे ओरीजनलच शेवटी अन्न अन्न करून शेतकऱ्यांच्या पाया पडताल हे लक्षात ठेवा अजून त्या शेतकऱ्याकडून काय करून घ्यायचा आहे बघा जर काही होत असेल आमच्यासाठी तर.. पुन्हा आमचं नाव घेताल होता एक राजा म्हणून...

पिकविमा आमच्या हक्काचा तो आमच्याकडून भरून घेतला आहे त्याची परतफेड मात्र काहीच झालेली नाही पाऊस एवढा पडला आहे की अतिवृष्टी बीड जिल्ह्यात किती वेळ झाली आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे त्या अती पावसाने तुर गेली,मूग गेला, उडीद गेला,सोयाबीन गेली, तरीही पिक विमा अजूनही आम्हाला मिळाला नाही कधी भेटणार आहे. हा आमचा पिक विमा हा आमचा हक्काचा पिक विमा आता तरी द्या आम्हाला थोडी तरी मेहरबानी करा या शेतकऱ्यावर तो पिक विमा मिळाला तर आम्ही पुढच्या तयारीला तरी लागुत कि.. पुढे पाऊस पडला तर खत बी बियाणे घेऊ पेरणी करू आमच्या हक्काचा आहे ते तरी आम्हाला मेहरबानी करुन द्या... असे शेतकरी अरुण मस्के म्हणाले.

पेरलं तर त्याला पाऊस येत नाही आला तर एखादा येतोय आणि वारं फिरं आलं तर सगळं सुपडा साफ करून जातयं..इकडून तिकडून निट केलं तर त्याला डुकरं येतात खाऊन घेतात तर तुमचं तेल दोनशे रुपये किलो शेंगदाणे शंभर रुपये किलो तुझ्यासारखे गरिबांनं खावं काय..? आमचं विकायचं चाललं चाललं दहानी-बारानी अठरानी आमच्याला भावचं नाही.. याच्यात आमचंच गटार भरणा आमचा ऊस चाललाय अडीच हजारांनी गुळ चाललाय 50 रुपयांनी आमच्या सारख्या गरीब आणि काय घ्यावं घरात सगळे मिळून दहा-बारा माणसं आहेत सगळे डुकरांनी खाल्ला आहे आम्ही आता काय खावं जावा का आम्ही आता बीडमध्ये मजुरी करायला दहा पाच रुपये कर्ज असतं ते कधी माफ नाही लगेच तुमच्या दारात उभे आहेत कर्जवसुली करायला..

सरकारकडे आमची हीच मागणी आहे की आमची कर्जमाफी करावी व गरीब शेतकऱ्यांना काही द्यावं शेतकरी फार अडचणीत आहे यावर्षी पाऊस आणि वार संघच आलं त्यामुळे ज्वारीचे एकही चिपाड उभं राहिलं नाही आणि त्यामुळे जनावरांना टाकायला वैरण शिल्लक राहिली आहे. जे सरकारी नोकरीला आहेत ते 30 दिवस गेलं की तीस हजार रुपये महिना येतो आम्ही तीस दिवस जरी काम केलं तरी तीस पैसेही आमच्या हातात येत नाहीत. निवडणुकीच्या वेळेस म्हणतात या या आम्हाला निवडून द्या निवडून दिले की गेले टिंगारले आम्ही मेलो तरी आम्हाला तुम्ही पाहायला येत नाही पर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत ताई म्हणते ना आई बाई म्हणते ना पुन्हा बघायला कुणी येत नाही सगळ्या आमदारांनी हेच केलं आहे..

आम्ही म्हशी पाळतो दूध घेऊन जातो दूध विकतो 50/रुपये लिटर पहिल्या लोकांनी चाळीस रुपयांनी खाल्लेलं आहे खुराक झालं आहे पंचेचाळीस रुपये किलो आता आम्ही काय करायचं म्हशीला काय टाकायचं त्या आमदाराच्या पॅंटी आणून टाकू का... शेतीला काही सोडले धंदा नाही म्हैस आणायला जावं 80 हजार रुपये आणायचे आणि 40/रुपये लिटर दूध घालायचं 45 रुपये किलो खुराक घ्यायचं आणि आमच्या गड्यानं काय करायचं हाच मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे आता आम्ही काय करावं असेल तर यापुढे मोठा प्रश्न आहे.. असे शेतकरी महिला निर्मला बाबासाहेब मस्के म्हणाल्या.


Updated : 28 March 2022 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top