Home > मॅक्स रिपोर्ट > हॉटेल कामगारांच्या आयुष्यातील जगण्याची चव कधीच संपली...

हॉटेल कामगारांच्या आयुष्यातील जगण्याची चव कधीच संपली...

हॉटेल कामगारांच्या आयुष्यातील जगण्याची चव कधीच संपली...
X

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुख्य व्यवसाय ठप्प झाले. पण याच बरोबर ह्या व्यवसायवर अवलंबून असणारे अनेक घटक सुद्धा रस्त्यावर आली. त्यातीलच एक म्हणजे हॉटेलमध्ये काम करणारे कामगारांचा समावेश आहे. त्यामुळे तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या कामगारांच्या आयुष्यातील जगण्याची चव कधीच संपली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील कवळा या गावातील रहवासी असलेले शरद इंगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून आचारी म्हणून हॉटेलमध्ये काम करतात. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांनी सहा वर्षांपूर्वी आपलं गाव सोडलं, त्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या शरद यांना औरंगाबादच्या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम मिळालं.

महिनाभर काम करून तुटपुंज्या पगारावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात, त्यात गावाकडे आई-वडिलांना सुद्धा पैसे पाठवावे लागतात. पण ओढूनताणून आयुष्य सुरू असतानाच कोरोनाच संकट आलं आणि होत्याच नव्हतं झालं.


कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला, पण होम डिलिव्हरीची सुविधा चालू ठेवली होती.मात्र ग्रामीण भागात होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध नसल्याने मालकाने हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे शरद यांचही काम बंद झालं.काम नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली, त्यामुळे घरभाडे सुद्धा भरण्यासाठी पैसे नसल्याचं शरद म्हणतात.

तर लॉकडाऊन काळात नोकरी गेल्याने आर्थिक उत्पन्ना येण्याचा मार्ग बंद झालं, त्यामुळे हतबल झालेल्या शरद यांना गावाकडील जमीन विकण्याची वेळ आली. गावातील काही जमीन विकून त्यातून आलेल्या पैशावर दिवस काढतोय, पण तेही कधीपर्यंत पुरणार असा प्रश्न शरद यांना पडला आहे.


शरद यांच्याप्रमाणेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर कामगारांची अवस्था आहे.कोरोना काळात काम बंद असल्याने एक वेळच जेवणाची सुद्धा सोय करणे अवघड झालं होतं,पण आता पुन्हा ऑनलॉकची घोषणा झाल्याने काम करून दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा हॉटेल कामगारांना लागली आहे.

ग्रामीण भागातील हॉटेल बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांवर लॉकडाऊन काळात आर्थिक संकट छाताडावर येऊन बसला होता.मात्र सरकारने कडक निर्बंध मागे घेतल्याने कष्टाच्या घामाने पुन्हा दोन पैसे खिशात पडतील ह्या अपेक्षाने अनेक हात पुनः सक्रिय होत आहे. पण पुन्हा तिसऱ्या लाटेच्या चर्चेने त्यांच्या मनात कोरोनापेक्षा जगणार कसं याची भीती अधिक जाणवत आहे.

Updated : 8 Jun 2021 4:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top