Top
Home > मॅक्स रिपोर्ट > #GroundReport : कोरोना संकटामुळे आरोग्य व्यवस्थाच आजारी, मंगळसूत्र विकून औषधं आणण्याची वेळ

#GroundReport : कोरोना संकटामुळे आरोग्य व्यवस्थाच आजारी, मंगळसूत्र विकून औषधं आणण्याची वेळ

कोरोनाची दुसरी लाट राज्यात गंभीर स्वरुप धारण करत असताना आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा उघड होऊ लागल्या आहेत. आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

#GroundReport : कोरोना संकटामुळे आरोग्य व्यवस्थाच आजारी, मंगळसूत्र विकून औषधं आणण्याची वेळ
X

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता गंभीर झाली आहे. दर दिवसाला रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. पण या सर्व संकटात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. औरंगाबादच्या मेलट्रॉन कोविड सेंटरमध्ये सात दिवसांपूर्वी सुखदेव गोरे यांच्या मुलाला कोरोनाच्या उपचारांसाठी दाखल केले. महानगर पालिकेचे रुग्णालय असल्याने पैसे लागणार नाहीत असं वाटलं मात्र मुलगा उपचारासाठी दाखल होताच त्याच्या सुखदेव यांच्या हातात औषधांचा कागद डॉक्टरांनी देत बाहेरून औषध आणायला सांगितले....आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषध कशी आणायची असा प्रश्न पडल्याने हताश झालेल्या सुखदेव गोरे यांनी आपल्या पत्नीचे मणी - मंगळसूत्र आणि जोडवे पाच हजारांमध्ये विकले आणि औषध आणली...औरंगाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे...परिणामी सरकारी कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी बाहेरील मेडिकलवर पळापळ करण्याची वेळ आली आहे. एकट्या सुखदेव गोरेंची ही परिस्थिती नाही तर कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची आहे. वाढत्या रुग्णांमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. प्रत्येक शंभर जणांच्या चाचण्यांमधून 25 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे...
औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक मिनिटाला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होत आहे. शहरातील रुग्णालये भरली आहेत. तर अनेक जण बेड मिळत नसल्याची तक्रार करत आहेत. .त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे, मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही...

Updated : 26 March 2021 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top