Home > मॅक्स रिपोर्ट > Global Hunger Index 2022 : उपासमारीत भारताची अवस्था श्रीलंका, पाकिस्तानपेक्षाही गंभीर

Global Hunger Index 2022 : उपासमारीत भारताची अवस्था श्रीलंका, पाकिस्तानपेक्षाही गंभीर

जागतिक भूक निर्देशांक जाहीर झाला आहे. मात्र यामध्ये भारतातील भयान वास्तव समोर आले आहे.

Global Hunger Index 2022 : उपासमारीत भारताची अवस्था श्रीलंका, पाकिस्तानपेक्षाही गंभीर
X

Global Hunger Index 2022 : नुकताच जागतिक भूक निर्देशांक जाहीर झाला. यामध्ये भारताची (India) अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. या यादीत पाकिस्तान (pakistan), श्रीलंका (Shrilanka) आणि बांग्लादेश (Bangladesh) या देशांची स्थिती भारतापेक्षा चांगली असल्याचे समोर आले आहे.

कन्सर्न वर्ल्डवाईड अँड वेल्थंगरहिल्फ या संस्थेतर्फे दरवर्षी जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger index) जाहीर केला जातो. त्याप्रमाणे यंदा या संस्थेने जागतिक भूक निर्देशांक जाहीर केला आहे. या यादीत भारताची 107 व्या (India Rank in Global Hunger index) स्थानी घसरण झाली आहे. याबरोबरच 29.1 गुणांसह भारताचा समावेश गंभीर श्रेणीमध्ये करण्यात आला आहे.



पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका सुस्थितीत (Pakista, Bangladesh,Shrilanka in good situation)

जागतिक भूक निर्देशांकामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंका, पाकिस्तानसारख्या देशांचा क्रमांक अनुक्रमे 64 आणि 99 व्या क्रमांकावर आहेत. याबरोबरच भारताचा शेजारी असलेला नेपाळ (Nepal ) 81 व्या स्थानी तर बांग्लादेश (Bangladesh) 99 व्या स्थानी आहे. मात्र जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा दावा करण्यात येणारा भारत 107 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताचा समावेश गंभीर श्रेणीत करण्यात आला आहे.



जागतिक भूक निर्देशांक कसा मोजला जातो? (How to calculate Global hunger index)

कन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थंगरहिल्फ (concern worldwide and welthungerhilfe) या संस्थेतर्फे दरवर्षी एक अहवाल प्रसिध्द केला जातो. यामध्ये जगभरातील राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक (Local) पातळीवरील उपासमारीची जी स्थिती आहे, त्याबाबत सर्वेक्षण केले जाते आणि अहवाल प्रसिध्द केला जातो.

जागतिक भूक निर्देशांकाच्या माध्यमातून उपासमारीविरुध्दच्या संघर्षाबाबत जागरुकता वाढवणे. तसेच ज्या भागात उपासमारीचे जास्त प्रमाण आहे, त्या भागाकडे अधिक लक्ष देण्यासाठी जागतिक भूक निर्देशांक मोजला जातो.

जागतिक भूक निर्देशांक मोजण्यासाठी कुपोषण (Undernorishment), बालकांच्या उंचीचे प्रमाण (Child Stunting), बालकाच्या वजनाचे प्रमाण ( ) आणि बालमृत्यू दर यावरून भूक निर्देशांक काढला जातो.


जागतिक भूक निर्देशांक मोजण्याचे तीन टप्पे (Phase of calculate Global Hunger index)



जागतिक भूक निर्देशांक किती देशांचा मोजला जातो?

2021 मध्ये प्रसिध्द झालेल्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये 116 देशांमध्ये भारताचा 101 वा क्रमांक होता. मात्र यंदा भारताची आणखी घसरण होऊन भारत 107 व्या स्थानावर पोहचला आहे. त्यामुळे यंदा प्रसिध्द झालेल्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये अफगाणिस्तान 109 वा क्रमांक वगळता सर्व देश भारताच्या पुढे आहेत.

जागतिक भूक निर्देशांकामध्ये चीन व कुवैत वगळता 17 देश सर्वोच्च स्थानी आहेत. यामध्ये येमेन 121 व्या स्थानी आहे.

बुरुंडी (Burundi), सोमालिया (Somaliya), दक्षिण सुदान (South Sudan ) आणि सिरीयन अरब रिपब्लिक (Syrian Arab republic ) या देशांना धोक्याचा इशारा दिला आहे.

२००० ते २०२२ या कालावधीत भारताचा वाढलेला भूक निर्देशांक

२००० ते २०१६ या कालावधीत भारताचा भूक निर्देशांक ३८ पासून ते २५ च्या खाली आला होता. मात्र २०१७ पासून जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताची पुन्हा घसरण सुरु झाली. यामध्ये २०२२ च्या जागतिक भूक निर्देशांक अहवालानुसार भारताला २९ गूण मिळाले आहेत.




Updated : 16 Oct 2022 9:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top