Home > मॅक्स किसान > "वास्तविक अहवाल द्या हो..." शेतकऱ्यांची भावनिक विनंती

"वास्तविक अहवाल द्या हो..." शेतकऱ्यांची भावनिक विनंती

वास्तविक अहवाल द्या हो... शेतकऱ्यांची भावनिक विनंती
X

उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या सहा केंद्रीय सदस्य समितींनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पारोळा, अमळनेर तालुक्यात पाहणी केली. गुरुवार ६ डिसेंबर रोजी तालुका रेवली येथे दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आले होते. त्यांनी या गावास भेट दिली आणि तेथील शेतकरी बांधव व नागरिक यांच्याशी देखील संवाद साधला. या पथकाने एका ठिकाणी कापसाची पाहणी केली तेव्हा त्यांना शेतकऱ्यांनी ‘साहेब, दुष्काळाचा वास्तविक अहवाल द्या हो’अशी विनंती केली.

तसेच शेतकऱ्यांनी पथकाला, " साहेब, आम्ही दुष्काळी परिस्थितीने उद्ध्वस्त झालो आहोत. वास्तविक अहवाल द्या हो... दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी भावनिक विनंती केली.

Updated : 7 Dec 2018 10:51 AM GMT
Next Story
Share it
Top