Home > मॅक्स रिपोर्ट > MaxMaharashtraImpact बहुचर्चित पूजा लहांगे आत्महत्या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

MaxMaharashtraImpact बहुचर्चित पूजा लहांगे आत्महत्या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

MaxMaharashtraImpact बहुचर्चित पूजा लहांगे आत्महत्या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
X

पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुलीच्या आत्महत्येवरुन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस यंत्रणेला अखेर जाग आली असून आरोपी संजय रावते सीलिन लहांगे यांच्यावर 376 व 306 अंतर्गत डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बहुचर्चित पूजा लहांने आत्महत्या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी संजय रावते व सीलिंग सिलिन लहांगे यांच्यावर 376.306.34. अंतर्गत डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तीन महिन्यांच्या कालावधी उलटूनही डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. यामुळे एकीकडे राजकीय दबाव व आमिषाला पोलीस प्रशासन बळी पडल्याने या प्रकरणात पळवाटा काढून गुन्हा दाखल केला जात नव्हता. तर दुसरीकडे मृत्यू पूजा चे आईवडील आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी आर्त टाहो फोडत होते. यावेळी मॅक्समहाराष्ट्र पीडित कुटुंबाचा आवाज बनून पोलिसांकडून खोट्या ठरवल्या जाणाऱ्या या घटनेची सत्यता व वास्तव समोर आणले. सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करण्यात आला याची दखल डहाणू न्यायालयाने घेऊन या मोकाट आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर दिनांक 22 जानेवारी2022 रोजी डहाणू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला .

घटना नेमकी काय?

1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ऐना-दाभोंण रस्त्यावर गावातील दोन तरुणांनी या मुलीला विषारी पदार्थ मिसळलेले शीतपेय पाजून पळून गेले. यानंतर मुलीच्या पोटात वेदना सुरू झाल्या, त्यानंतर त्या मुलीने जवळच्या दुकानात जाऊन आपल्या काकांना घटना सांगितली. त्यानंतर तिचे काका आणि बहिणीने ऐना येथील शासकीय रुग्णालयात नेले. पण तिची प्रकृती बिघडल्याने तिला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर पर्यंतचा घटनाक्रम

दाभोन ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांची ही मुलगी तलासरीमधील महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत होती. दीड वर्षांपासून महाविद्यालय बंद असल्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तिने बोईसर येथे क्लिनिकमध्ये कामाला सुरूवात केली होती. 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी घरी जाण्यासाठी ती बोईसर बसस्टँडवर 7.20 च्या बसमध्ये बसली होती. त्यावेळी दाभोण गावातील संजय रावते याने तिला बसमधून उतरवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पालघरच्या दिशेने घेऊन गेला. यावेळी त्याने तिचा मोबाईल ताब्यात घेऊन बंद करून टाकला होता. दुचाकी उमरोळीवरून मागे फिरवून बोईसर- चिल्हार रस्त्यावरील नागझरी गावच्या हद्दीतील लॉजमध्ये जबरदस्तीने रात्रभर बंदिस्त ठेऊन तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी ती तरुणी पुन्हा बोईसरला कामाच्या ठिकाणी पोहोचून दुपारच्या सुमारास आपल्या घरी परतत असताना संजय रावते आणि सिलिन लहांगे यांनी तिला रस्त्यात गाठले. यावेळी संजय याने दोन शितपेयाच्या बाटल्या सोबत आणल्या होत्या. शीतपेयात विषारी पदार्थ मिसळले होते, त्याने बाटलीमधील शीतपेय पिण्यास तिला सांगितले. संजय स्वतः विषयुक्त शीतपेय पिणार असल्याचे सांगत संजय रावते याने विषारी शीतपेय तिलाही पिण्यास सांगितले. तिने विषारी शीतपेयाचे सेवन केल्यानंतर संजय आणि सिलिनने तेथून पळ काढला होता". कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या त्या तरुणीचा 2 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला परंतु आता या मोकाट आरोपींवर गुन्हा दाखल झाल्याने मृत्यू पूजाच्या आईवडिलांनी मॅक्समहाराष्ट्र चे आभार मानले आहेत


मॅक्समहाराष्ट्र हे येथील शोषित पीडित दुर्बल घटकाचा बुलंद आवाज आहे मॅक्समहाराष्ट्र ने केलेल्या पाठपुराव्यामुळे या घटनेतील न्यायाची धार तीक्ष्ण झाली आणि यामुळे या मृत्यू पूजाला न्याय मिळाला या न्याय प्रक्रियेत मॅक्समहाराष्ट्र चा वाटा देखील तितकाच मोलाचा आहे असे पालघर जिल्हा कॉंग्रेसचे सचिव अनंता वणगा यांनी सांगितले.

Updated : 23 Jan 2022 1:56 PM GMT
Next Story
Share it
Top