Home > मॅक्स रिपोर्ट > पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक :नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'पुढे मांडली व्यथा

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक :नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'पुढे मांडली व्यथा

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक   :नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मॅक्स महाराष्ट्रपुढे  मांडली व्यथा
X

जुलै ,ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे , त्यानंतर प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार पीक विमा कंपनीकडून संबंधित पिकांच्या नुकसानाची भरपाई मिळेल असे निर्देश असताना जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर येथील शेतकऱ्यांना मिळालेला पीक विमा परतावा हा अत्यंत तुटपुंजा असून या इफको टोकियो नावाच्या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक केल्याची व्यथा शहापूर येथील शेतकऱ्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र' जवळ आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्या भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान शंभर टक्के झाले आहे म्हणजेच ज्यांचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले होते अशा शेतकऱ्यांना देखील तुटपुंजी रक्कम मिळाली असल्याने शेतकरी नाराज आहेत. नांदेड जिल्ह्यातील शहापूर सोबतच शेवाळ, तमलूर, शेळगाव या भागात झालेल्या अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना बी, बियाणे ,मशागतीचा खर्च तरी निघावा अशी किमान अपेक्षा असताना सदरील पीकविमा कंपनीने तो देखील दिलेला नाही. हा भाग तेलंगाणा सीमेवरचा भाग असल्याने तेलंगाणा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारी मदत पाहता महाराष्ट्रातील मदत ही तुटपुंजी रक्कम आहे ,तेलंगाणाच्या धर्तीवर ही मदत मिळावी ही अपेक्षा या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी 'मॅक्स महाराष्ट्र'शी बोलताना ,या भागातील तरुण योगेश सुरकुंटे म्हणाला की, आम्ही एका सोयाबीन बॅगसाठी 3500 रुपये खर्च केले , 2 हेक्टर शेतीसाठी बी बियाणे, इतर खर्च असे एकूण 14 ते 15 हजार रुपये खर्च आला . सुरुवातीला आमच्या शेतात पिकांची स्थिती चांगली होती ,परंतु जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पीक पाण्याखाली गेले, त्यानंतर पीक विम्यासाठी आम्ही अर्ज केला असता आतापर्यंत केवळ 4800 रुपये म्हणजेच हेक्टरी 2200 रुपये जमा झाले आहेत, पीक विम्याच्या या परताव्याचा आणि या विमा कंपनीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

या विमा कंपनीकडे स्वतःचा अपडेट ऍप नाही, प्रधानमंत्री फसल बिमा योजना या ऍपवरच पीक नुकसानीची नोंद करण्याच्या सूचना देण्यात येतात, विमा प्रतिनिधी बांधावर येत नाहीत, शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या कार्यालयाकडे जावे लागते, यासोबतच यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचेही या परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.

ज्या भागात नदी ,ओहोळ आहेत त्या ठिकाणी शंभर टक्के नुकसान परतावा देण्यात यावा , आई स्पष्ट निर्देश असताना, या विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून झालेल्या पंचनाम्यात खूप भिन्नता दिसून येत आहे.पूर्णपणे शंभर टक्के नुकसान असेल 25 हजार रुपये तर काहींना अगदी केवळ 5000 देण्यात आले आहेत.

कंपनीचे प्रतिनिधी सामुहिक पंचनामे करतात आणि सरासरी 20 ते 25 शेतकऱ्यांना 25 हजार देतात आणि इतर सरसकट शेतकऱ्यांना केवळ 5 हजार रुपये देण्यात आले आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Updated : 16 Nov 2021 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top