Home > मॅक्स किसान > महाशिवरात्रीच्या दिवशीच महादेव गेला…

महाशिवरात्रीच्या दिवशीच महादेव गेला…

महाशिवरात्रीच्या दिवशीच महादेव गेला…
X

महाशिवराञी दिवशीच महादेव गेला तो का गेला? याचं चिंतन झालं पाहिजे. खर्डेवाडी ता, जिल्हा बीड येथील महादेव रामभाऊ भोसले वय वर्ष अवघे ३५ वर्ष. तरुणच त्याला जसं बघाल तसा तो भगव्या रंगात रंगुन गेलेला युवा शेतकरी. गळ्यात कायम भगवा गमजा टाकलेला आणि हातात भगवा दोरा गुंडाळलेला एक शिवसैनिक म्हणुन तो परिचीत होता.

कुटुंबातील दोन लहान मुलं, बायको, आई-वडील यांना मागे ठेवुन या भगव्याच्या शिवसैनिकाने खांद्यावर भगवा टाकुन गळ्यात नियतीचा फास आडकवून घेतला. मात्र, महादेवावर ही वेळ का आली? याचा विचार करणं गरजेचं आहे.

शेतीचे उत्पन्न घटलं आहे. घरातील परिस्थीती आणखीनच बिघडत चालली आहे. नैराश्य वाढलं. भगव्याच्या राज्यात दाखवलेली स्वप्न पूर्ण झाली नाही. त्याने मुद्रालोन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. चौकशी करायचा शेळीपालनची माझी फाईल होईल का ? कुकूट पालनासाठी अर्थसाह्य मिळेल काय? हातात सतत चार कागद घेऊन गळ्यात शिवसेनेचा गमजा आडकवून फिरणारा महादेव माञ, दररोज निराश होऊन घरी यायचा. या वर्षी कांदा पिकाने निराशा केली होती. वडिलांच्या नावावरील वाट्याला आलेली शेती त्याला अल्पभुधारकाच्या यादीत बसवणारी होती. पण आपल्याच राज्यात आपलीच दैना होतीय. याची सल तो कायम बोलुन दाखवायचा. आजच्या दिवशी शिवाचा जययकार करत हे महाशिवराञीच पावन पर्व पूर्ण देशात साजर होईलच पण त्याच दिवशी या शिवभक्त महादेवाच्या घरी माञ, दुखाचा अर्त तांडव सुरू आहे.

…. महादेवा तुझ्या जाण्यानं संपले का सगळे प्रश्न ? हा प्रश्न तेवढा अनुत्तरीत राहतो.

Updated : 4 March 2019 4:28 AM GMT
Next Story
Share it
Top