Home > Election 2020 > सर्वे : 41% लोक मानतात मोदींनी राफेलमध्ये घोटाळा केला!, पंतप्रधान म्हणून मोदींना 43 % लोकांची पसंती
सर्वे : 41% लोक मानतात मोदींनी राफेलमध्ये घोटाळा केला!, पंतप्रधान म्हणून मोदींना 43 % लोकांची पसंती
Max Maharashtra | 5 April 2019 7:40 PM IST
X
X
देशात निवडणूकांचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यात देशात जरी अयोध्या राफेल आणि गोरक्षा असे मुद्दे जरी असले तरी लोकसभा निवडणुकांमध्ये विकास हाच महत्वाचा मुद्दा असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. सीएसडीएस-लोकनीति-तिरंगा टीवी - द हिंदू आणि दैनिक भास्कर यांनी निवडणूकीपुर्वी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
या सर्वेक्षणात 43 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिली पसंती दिली आहे. मात्र, यामध्ये विशेष बाब म्हणजे 41 टक्के लोकांनी राफेल घोटाळ्यात गडबड झाल्याचं मान्य केलं आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी ‘न्याय’ सारख्या मोठ्य़ा योजनेची घोषणा करुनही 28 टक्के लोकांनाच राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं असं वाटतं आहे. तर फक्त 3 टक्के लोकांना असं वाटते की राफेल आणि मंदीर हेच तीन मोठे विषय आहेत. या सर्वेक्षणानुसार देशातील 33 टक्के लोक विकास आणि 25 टक्के लोक हे महागाईच्या मुद्यावर मतदान करतील.
कसा झाला सर्वे?
हे सर्वेक्षणात देशातील 19 राज्यामध्ये 24 ते 31 मार्च या दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये 101 लोकसभा मतदारसंघातील 101 विधानसभातील 10 हजार 010 मतदारांची मत जाणून घेण्यात आली. यामध्ये 46 टक्के महिला, अनुसूचित जाती -19 ट्क्के, 10 टक्के अनुसूचित जनजाती, 13 टक्के मुस्लिम, 2% ख्रिश्चन आणि 3% शीख मतदारांचा समावेश आहे.
बालाकोट, सवर्ण आरक्षण, किसान सन्मान योजनेचा मोदींना फायदा
या सर्वेक्षणामध्ये काही आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. मे 2018 मध्ये मोदी पंतप्रधान व्हावेत असं 34 टक्के लोकांना वाटत होते. मात्र, आता 24 ते 31 मार्च दरम्यान झालेल्या सर्वेमधील 43 टक्के लोकांना मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत असं वाटतं. याचा अर्थ बालाकोट, सवर्ण आरक्षण, किसान सन्मान योजनेमुळे मोदींची लोकप्रियता वाढली असल्याचं दिसून येतं आहे.
मतदान करताना कोणता मुद्दा ठरणार महत्वाचा?
उत्तर ट्क्केवारीत | |
विकास | 33 |
महागाई | 25 |
बेरोजगारी | 20 |
पाकिस्तान वर केलेली एअर स्ट्राईक | 4 |
आरक्षण | 3 |
गोरक्षा | 2 |
मंदिर-मस्जिद | 2 |
राफेल करार | 1 |
नागरिकता विधेयक | 1 |
अन्य मुद्दे | 3 |
कोणतेही उत्तर नाही | 6 |
जर आपल्याला बालाकोट एयर स्ट्राइक बाबत माहिती असेल तर...
मोदी सरकार हे निवडणूकीच्या तोंडावर निवडणूकीत फायदा घेण्यासाठी करत आहे का? तुम्ही याबाबत सहमत/असहमत आहात का?
एनडीए ला पुन्हा एकदा संधी द्यावी का?
निवडणूकी पूर्वी 2019 (%) | मे 2018 (%) | |
मोदी सरकारला आणखी एक संधी द्यावी का? | 46 | 39 |
मोदी सरकारला आणखी एक संधी नको | 36 | 47 |
सांगू शकत नाही | 12 | 14 |
उत्तर भारतात सरकारवर जास्त विश्वास...
मोदी सरकारला आणखी एक संधी द्यावी (%) | मोदी सरकारला आणखी एक संधी नको (%) | |
उत्तर भारत | 52 | 35 |
दक्षिण भारत | 29 | 47 |
पूर्व भारत | 50 | 30 |
पश्चिम-मध्य भारत | 49 | 35 |
लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान पदी तुम्ही कोणाला पसंद कराल?
मे 2014 (%) | मे 2018 (%) | निवडणूक पूर्व 2019 (%) | |
नरेंद्र मोदी | 36 | 34 | 43 |
राहुल गांधी | 16 | 24 | 24 |
मायावती | 2 | 3 | 3 |
ममता बनर्जी | 1 | 3 | 2 |
इतर नेता | 17 | 19 | 13 |
कोणतेच उत्तर नाही | 28 | 17 | 15 |
बालाकोट एअर स्ट्राईकचे श्रेय कोणाला देणार?
मे 2014 (%) | मे 2018 (%) | निवडणूक पूर्व 2019 (%) | |
नरेंद्र मोदी | 36 | 34 | 43 |
राहुल गांधी | 16 | 24 | 24 |
मायावती | 2 | 3 | 3 |
ममता बनर्जी | 1 | 3 | 2 |
इतर नेता | 17 | 19 | 13 |
कोणतेच उत्तर नाही | 28 | 17 | 15 |
देशातील प्रत्येक भागातील मतदारांनी एअर स्ट्राईकचे श्रेय मोदी सरकार ऐवजी वायू सेनेला दिलं असून यामध्ये सर्वाधिक 60 टक्के दक्षिणेतील मतदारांनी आपल्या मतांचे श्रेय वायू सेनेला दिलं आहे. तर दुसरीकडे हिंदी पट्यातील 22 टक्के मतदारांनी मोदींना या एअर स्ट्राईकचे श्रेय दिले आहे.
आपल्याला असं वाटतं का मोदी सरकारने राफेल करारात गडबड केली आहे...
[button color="" size="" type="square_outlined" target="" link=""]
होय: 41 टक्के
नाही: 37 टक्के
[/button]
गडबड केली | गडबड केली नाही | |
उत्तर भारत | 42 | 36 |
दक्षिण भारत | 53 | 33 |
पूर्व भारत | 31 | 39 |
पश्चिम-मध्य भारत | 37 | 39 |
ज्या लोकांना वाटतं की, सरकारने राफेल घोटाळ्यात मोठी गडबड केली आहे. त्यातील 31 टक्के लोकांना मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावसे वाटत नाही.
बालाकोट, सवर्ण आरक्षण या बाबत काही ऐकले आहे का?
शेतकरी असाल तर मागच्या महिन्यात काही नगदी पैसे मिळाले का?
बालाकोट एअर स्ट्राईक | सवर्ण आरक्षण | किसान सन्मान योजनेचा लाभ | |
उत्तर | 83 | 61 | 45 |
पूर्व | 78 | 56 | 23 |
पश्चिम-मध्य | 79 | 55 | 25 |
दक्षिण | 73 | 53 | 25 |
सर्वात जास्त प्रभाव बालाकोट एअर स्ट्राइक चा दिसून आला. सवर्ण आरक्षण आणि किसान सन्मान योजनेबाबत तुलनेने कमी लोकांना माहिती आहे.
काय आपण कॉंग्रेसच्या न्याय योजनेबाबत ऐकले आहे का?
[button color="" size="" type="square" target="" link=""]
होय – 52 टक्के
नाही – 48 टक्के
[/button]
ज्या लोकांना कॉंग्रेसच्या न्याय योजनेबाबत माहिती नाही अशा 21 टक्के लोकांना मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा आहे. या श्रेणीतील 44 टक्के लोकांना मोदी पंतप्रधान व्हावेत असं वाटतं. ज्या लोकांना कॉंग्रेसची ही योजना माहिती आहे. त्यातील 28 टक्के लोकांना राहुल तर 42 टक्के लोकांना मोदी पंतप्रधान व्हावेसे वाटतात.
किसान सन्मान योजना, एअर स्ट्राइक आणि सवर्ण आरक्षणामध्ये मोदींची लोकप्रियता 9 टक्क्यांनी वाढली .
बालाकोट, सवर्ण आरक्षण, किसान सन्मान योजनेनंतर पंतप्रधान पदाच्या दाव्यावर काही परिणाम झाला का?
मोदी पंतप्रधान व्हावेत अशा व्यक्तीचं मत (%) | राहुल यांनी पंतप्रधान व्हावं अशा व्यक्तीचं मत | |
बालाकोट बाबत काही ऐकले नाही | 32 | 24 |
बालाकोट बाबत माहिती आहे | 46 | 24 |
सवर्ण आरक्षण बाबत माहिती नाही | 48 | 24 |
किस्सान सन्मान राशी नाही मिळाली | 42 | 27 |
किस्सान सन्मान राशी मिळाली | 54 | 22 |
बालाकोट एयर स्ट्राइकचा मोदींना फायदा
बालाकोट स्ट्राइकची माहिती असणाऱ्या लोकांनी मोदींना संधी द्यावी (%) | बालाकोट स्ट्राइक झालं हे माहिती नसतानाही मोदी सरकारला संधी द्यावी (%) | |
उत्तर भारत | 55 | 41 |
पूर्व भारत | 56 | 28 |
पश्चिम-मध्य भारत | 52 | 37 |
दक्षिण भारत | 34 | 16 |
एअर स्ट्राइक नंतरही दक्षिणेत राहुल गांधींची लोकप्रियता जास्त
बालाकोट स्ट्राइक नंतर पंतप्रधान म्हणून पसंती (%) | बालाकोट स्ट्राइक झालं हे माहिती नसतानाही पंतप्रधान पदाला पसंती (%) | |
पूर्व भारत | मोदी- 53, राहुल- 22 | मोदी- 31, राहुल-18 |
पश्चिम-मध्य भारत | मोदी- 50, राहुल-23 | मोदी- 45, राहुल- 26 |
उत्तर भारत | मोदी- 48, राहुल- 18 | मोदी- 30, राहुल- 18 |
दक्षिण भारत | मोदी-31, राहुल-37 | मोदी-25, राहुल-34 |
भाजपच्या 23% समर्थकांनी मोदी सरकारला नाही तर, एअर फोर्सला दिले बालाकोट स्ट्राइकचे श्रेय
एअर फोर्स ला श्रेय देणारे (%) | मोदी सरकारला श्रेय देणारे (%) | दोघांनाही श्रेय देणारे (%) | |
कॉंग्रेस समर्थक | 62 | 11 | 17 |
कॉंग्रेसच्या सहयोगी दलांचे कोणाला समर्थन | 69 | 11 | 14 |
भाजपा चे समर्थक | 23 | 29 | 43 |
भाजपाच्या सहयोगी दलांचे कोणाला समर्थन | 45 | 12 | 39 |
बसपाच्या सहयोगी दलांचे कोणाला समर्थन | 50 | 17 | 21 |
डावे समर्थक | 54 | 12 | 18 |
इतर पक्षाचे समर्थक | 56 | 10 | 24 |
कॉंग्रेस आणि त्यांच्या सहयोगी दलातील पक्षांच्या आणि डाव्या पक्षांच्या समर्थकांना पाकिस्तानवर मिलीट्री कारवाई करु नये असं वाटतं...
भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणं नष्ठ करावेत (%) | भारताने पाकिस्तान सोबत बातचित करावी (%) | |
कॉग्रेस समर्थक | 35 | 40 |
कॉग्रेसचे मित्र पक्ष | 42 | 49 |
भाजपचे मित्र पक्षाचे समर्थक | 56 | 27 |
भाजपाचे मित्र पक्ष | 54 | 32 |
बसपाचे मित्र पक्षाचे समर्थक | 52 | 28 |
लेफ्ट समर्थक | 23 | 53 |
इतर दलाचे समर्थक | 26 | 48 |
राफेल सौद्यामधील आरोपांचा कॉंग्रेसला फायदा झाला का?
राफेल सौद्यामध्ये गडबड झाली असल्याचे माहित असलेल्या मतदारांनीही मोदींना पसंती दर्शवली आहे.
सर्वेक्षणातील महत्वाचे मुद्दे
मोदी सरकारची इमानदार प्रतिमा कायम
भाजपा समर्थकही राफेलमध्ये घोटाळा झाल्याचे मान्य करतात...
अयोध्या विवाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला सर्वाधिक पसंती
Updated : 5 April 2019 7:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire