Home > मॅक्स रिपोर्ट > मत दो पानी पर हमें घर दिजिए, धारावी पुनर्विकासावरून नागरिक संतप्त

मत दो पानी पर हमें घर दिजिए, धारावी पुनर्विकासावरून नागरिक संतप्त

मत दो पानी पर हमें घर दिजिए, धारावी पुनर्विकासावरून नागरिक संतप्त
X

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने अदानी प्रॉपर्टिज या कंपनीला मंजूरी दिली आहे. त्यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. साठ वर्षापासून आम्ही राहत आहोत. मात्र आमच्यानंतर येणाऱ्यांना घरं मिळाली. मात्र आम्हाला मिळाली नाहीत. आम्हाला स्वच्छ पाणी दिलं जात नाही. ते आम्हाला नाही दिलं तरी चालेल पण पात्र अपात्र न ठरविता आम्हाला घरं द्या, अशी मागणी धारावीतील नाईकनगर येथील नागरिकांनी केली आहे. तसेच नेत्यांकडून साठ वर्षांपासून आम्हाला फक्त आश्वासनंच दिली जात आहेत. त्यामुळे आम्हाला आता घर हवं आहे आणि ते सुद्धा याच धारावीमध्ये असं मत धारावीतील नागरिकांनी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांच्याशी बोलताना व्यक्त केले.Updated : 15 July 2023 2:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top