Home > मॅक्स रिपोर्ट > निवडणूकीच्या काळात नेत्यांच्या चित्रपटांवर बंदी घालावी ?

निवडणूकीच्या काळात नेत्यांच्या चित्रपटांवर बंदी घालावी ?

निवडणूकीच्या काळात नेत्यांच्या चित्रपटांवर बंदी घालावी ?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच म्हणजेच ५ एप्रिलला प्रदर्शित होतोय. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रत्यक्ष मतदाना आधीच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळं मतदान प्रभावित होण्याची शक्यताही काही जणांनी वर्तवली जात आहे. मात्र, हा निव्वळ चित्रपट असल्यानं त्यावर निर्बंध घालता येऊ शकत नसल्याचं, निवडणूक जाणकारांचं मत आहे. तर निवडणूकीच्या काळात राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांवर बंदी घातली पाहिजे, असं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय.

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटातून मोदींच्या आयुष्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट मतदारांना प्रभावित करू शकतो त्यापेक्षा हा चित्रपटच लोकसभा निवडणूकीत २०१९ च्या प्रचारासाठीही वापरला जाऊ शकतो. मात्र, हा चित्रपट आदर्श आचारसंहितेचा भंग करत नसल्याचं निरीक्षण काही माजी निवडणूक अधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे.

याआधीही राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट निघालेले आहेत. त्यात अगदी अलिकडचा चित्रपट म्हटलं तर ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ . या चित्रपटावरूनही बरीच चर्चा झाली होती. अशा राजकीय नेत्यांवरील चित्रपटांवर होणारा खर्च हा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात गृहीत धरला जात नसल्यानं उमेदवारांसाठीही हे चित्रपट फायदेशीरच ठरतात, असंही मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय.

राजकीय विरोधकांना टार्गेट करण्यासाठीही अशा चित्रपटांचा वापर केला जातो. ‘द ताश्कंद’ या चित्रपटातून नसीरूद्दीन शहा हे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जीवनपट उलगडणार आहेत. १९६५ मध्ये शास्त्री यांचं ताश्कंद इथं कशाप्रकारे निधन झालं होतं, हे या चित्रपटात दाखवता येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भाजप समर्थक विवेक अग्निहोत्री यांनी केलीय. हा चित्रपटही १२ एप्रिल २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.

२०१९ हे निवडणूकीच वर्ष आहे. याच वर्षी मोदींनी बॉलीवूडमधील कलाकारांसोबतही काढलेल्या सेल्फी चर्चेत राहिल्या होत्या. राजकीय नेत्यंाच्या आयुष्यावर किंवा त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटांमध्ये रॉनी स्क्रूवालाचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’, अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द अॅक्सिडंेटल प्राईम मिनिस्टर’ आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हे चित्रपट चर्चेत राहिलेले आहेत.

ऐन निवडणूकांच्या काळात अशा राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमुळं आचारसंहितेचा भंग होऊन मतदान प्रभावित होऊ शकतं, असाही मतप्रवाह आहे. तर दुसरीकडे हे चित्रपट वास्तविकतेपासून फार दूर असून त्यात राजकीय द्वेषच अधिक असल्याचं काहींना वाटतंय.

Updated : 21 March 2019 10:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top