Top
Home > मॅक्स किसान > खबरदार ऊसाचे राजकारण कराल तर - धनंजय मुंडे

खबरदार ऊसाचे राजकारण कराल तर - धनंजय मुंडे

खबरदार ऊसाचे राजकारण कराल तर - धनंजय मुंडे
X

दुष्काळामुळे शेतकरी आधीच संकंटात सापडला आहे. पाण्याअभावी त्याचा ऊस वाळत आहे, अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याऐवजी ऊसाचे गाळपात राजकारण कसले करता? खबरदार यापुढे ऊसाचे राजकारण कराल तर गाठ सभासद शेतकर्‍यांशी आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला दिला. यापुढे परिस्थिती न सुधारल्यास कारखान्यासमोरच सभासद शेतकरी आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला. त्या आधी त्यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले

शेतकरी वैद्यनाथ कारखान्याच्या ऊसाच्या राजकारणामुळे त्रस्थ झालेले आहेत, सभासद असतानाही केवळ मनमानी पोटी आणि राजकीय द्वेषभाव ठेऊन ऊसाचे गाळप केले जात असल्याने सभासद शेतकाऱ्यांमध्येच तीव्र असंतोष पसरला आहे. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी असंख्य सभासद आणि शेतकर्‍यांसह कारखान्याला धडक दिली. कार्यकारी संचालकांना कल्पना देऊनही ते न थांबल्याने अर्धा तास कार्यालयातच सर्वांनी ठाण मांडले. अखेर व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव, संचालक ज्ञानोबा मुंडे यांना शिष्टमंडळाला सामोरे जावे लागले. स्व.मुंडे साहेब व स्व.अण्णांनी कधीही ऊसाचे राजकारण केले नाही, विरोधकांच्या ऊस गाळपातही कधी भेदभाव केला नाही. तुम्ही स्वतःच्या सभासदाच्या ऊसाचे राजकारण कसले करता. दुष्काळात होरपळणारा शेतकरी तुमच्या धोरणामुळे मरण यातना भोगत आहे, परिस्थिती सुधारून हे राजकारण बंद न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.

Updated : 18 Dec 2018 9:39 AM GMT
Next Story
Share it
Top