Home > News Update > दिल्लीत ‘आप’ हॅट्ट्रीक करणार?

दिल्लीत ‘आप’ हॅट्ट्रीक करणार?

दिल्लीत ‘आप’ हॅट्ट्रीक करणार?
X

दिल्लीमध्ये आप (AAP) तिसऱ्यांदा सत्तेत येणार का? केजरीवाल सरकारचं काम चालणार की शाहीनबागचा मुद्दा चालणार याचा फैसला येणार आहे. मंगळवारी सकाळी आठपासून २७ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. दुपारी १२ पर्यंत स्पष्ट निकाल हाती येणार आहेत.

मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये (Delhi Exit Poll) सर्वच वृत्तवाहिन्यांनी आप पुन्हा सत्तेवर येणार असा अंदाज वर्तवला आहे. मात्र गेल्या वेळी केवळ ३ जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP) स्थिती यावेळी थोडीशी सुधारणार असल्याचंही या जनमत चाचण्यांमध्ये सांगण्यात आलंय. तर काँग्रेसच्या नशिबात यावेळी भोपळा येणार असल्याचं हे पोल सांगताहेत.

यावेळी मतदानाची टक्केवारी घटून ती ५६.० टक्क्यांवर आली आहे. २०१५ मध्ये मतदानाची टक्केवारी ६७ टक्के एवढी होती. मतदानाच्या टक्केवारीसंदर्भात अजूनही संभ्रम कायम आहेत. दुसरीकडे मुस्लिम बहुल मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं, यामध्ये मुस्तफाबाद ६६.२९ टक्के, मटिया महल- ६५.६२ तर सीलमपुर मतदासंघात ६४.९२ टक्के मतदानाची नोंद झालीये.

मात्र, यंदाच्या निवडणुका खूप चुरशीच्या झाल्या. प्रचारात अरविंद केजरीवाल आणि भाजपने प्राण फुंकले. भाजपने २४ केंद्रीय मंत्री, २४० खासदार आणि ११ आजी-माजी मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं होतं. तर अरविंद केजरीवाल (Arwind Kejariwal) यांनी ७० पैकी ६८ मतदारसंघात रोड शो केले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी आप सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर मते मागितली. दिल्लीमध्ये वीज बिलात केलेली कपात, मोफत पाणीपुरवठा, चांगल्या शाळा आणि मोहल्ला क्लिनीक या मुद्यांवर ‘आप’ने प्रचार केला. तर भाजपने शाहिनबागमधील आंदोलन, सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन या मुद्यांवर प्रचार केला. मात्र दिल्लीत तीनवेळा सरकार बनवणाऱ्या काँग्रेसने या निवडणुकीतून अंग काढून घेतल्याचं जाणवलं, तितकासा प्रभावी आणि आक्रमक प्रचार काँग्रेसने केला नाही.

कुणी किती सभा घेतल्या?

-नरेंद्र मोदी -०२

-अमित शहा- ३४

-राहूल गांधी- ०४

-अरविंद केजरीवाल- ६८

-प्रियंका गांधी-०२

-राजनाथ सिंह-११

-जे पी नड्डा-६३

यांची प्रतिष्ठा पणाला

-नवी दिल्ली

अरविंद केजरीवाल- आप

-म़ॉडल टाऊन

कपिल मिश्रा,भाजप

-मालविय नगर

सोमनाथ भारती- आप

-पटपडगंज

मनीश सिसोदिया- आप

-मुंडका

मास्टर आजाद सिंह वर्मा – भाजप

-ओखला

अमानतुल्लाह- आप

-चांदणी चौक

नअलका लांबा- काँग्रेस

-हरिनगर

तेजिंदर पाल बग्गा- भाजप

-गांधीनगर

अरविंद सिंह लवली- काँग्रेस

Updated : 10 Feb 2020 4:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top