Top
Home > मॅक्स रिपोर्ट > राज्यातील भाजपशासित महापालिकांमध्ये सर्वाधिक नागरिकांना कोरोनाची बाधा

राज्यातील भाजपशासित महापालिकांमध्ये सर्वाधिक नागरिकांना कोरोनाची बाधा

राज्यात कोरोनाचे संकट गंभीर होण्यास कोण जबाबदार आहे यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण आता राज्यातील महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोनाबाधीत रुग्ण आणि एकूण कोरोना बळींच्या आकडेवारीवरुन वेगळीच माहिती समोर आली आहे.

राज्यातील भाजपशासित महापालिकांमध्ये सर्वाधिक नागरिकांना कोरोनाची बाधा
X

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. या परिस्थितीला राज्यातील ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार करत असतात. पण राज्यातील महापालिकांच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर 27 पैकी 10 महापालिका ह्या भाजपच्या ताब्यात आहेत. या महापालिकांच्या आकडेवारीनुसार भाजपची सत्ता असलेल्या महापालिकांच्या परिसरात सर्वाधिक नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. भाजपच्या ताब्यातील 10 महापालिकांमध्ये आतापर्यंत 12 लाख 98 हजार 824 नागरिकांना कोरोना झाला आहे. तर या महापालिकांमध्ये आतापर्यंत 14 हजार 341 लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारच्या https://arogya.maharashtra.gov.in/1175/Novel--Corona-Virus या वेबसाईटवरील माहिती


राज्यातील 27 महापालिकांपैकी 10 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर मुंबईसह 7 महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. काँग्रेस 4 तर राष्ट्रवादीची 2 महापालिकांमध्ये सत्ता आहे. फक्त कोल्हापुरात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीची सत्ता आहे. उर्वरित 6 महापालिकांमध्ये स्थानिक आघाड्या किंवा शिवसेना-काँग्रेस, भाजप-शिवसेना अशा आघाड्या आहेत.

राज्य सरकारच्या https://arogya.maharashtra.gov.in/1175/Novel--Corona-Virus या वेबसाईटवरील माहिती


शिवसेनाशासित महापालिकांमध्ये सर्वाधिक कोरोना बळी

सध्या राज्याचे मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेच्या ताब्यात 7 महापालिका आहेत. यामध्ये आतापर्यंत 10 लाख 9 हजार 749 नागरिकांना कोरोनाची बाधी झाली आहे. तर या 7 महापालिकांच्या क्षेत्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. आतापर्यंत या महापालिका क्षेत्रांमध्ये 17 हजार 699 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. तर काँग्रेसच्या ताब्यातील चार महापालिकांमध्ये 1 लाख 5 हजार 224 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

राज्य सरकारच्या https://arogya.maharashtra.gov.in/1175/Novel--Corona-Virus या वेबसाईटवरील माहिती


राज्य सरकारच्या https://arogya.maharashtra.gov.in/1175/Novel--Corona-Virus या वेबसाईटवरील माहिती

एकूणच महापालिका क्षेत्रांचा विचार केला तर भाजपची सत्ता असलेल्या महापालिकांमध्ये एकूण रुग्णसंख्या जास्त आहे. तर शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकांच्या क्षेत्रात कोरोनाने सर्वाधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे या पक्षांनी राजकारण करण्यापेक्षा कोरोनाच्या संकटाशी सामना करुन सामान्यांचा जीव कसा वाचवता येईल यावर विचार करण्याची गरज आहे.

Updated : 30 April 2021 11:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top