Home > News Update > Covid 19: महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाची आत्ताची रुग्ण संख्या किती?

Covid 19: महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाची आत्ताची रुग्ण संख्या किती?

Covid 19: महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाची आत्ताची रुग्ण संख्या किती?
X

राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील २३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १८९० (८१ टक्के) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत. तर ३९३ रुग्णांना (१७ टक्के) रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण (२ टक्के) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,८७९. लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील मुंबई येथील ७ आणि मालेगाव येथील २ रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या २ रुग्णांना इतर काही आजार आहेत का? याची माहिती अद्याप अप्राप्त आहे.

उर्वरित ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये (७१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३२ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३०३२ (१३९)

ठाणे: २० (२)

ठाणे मनपा: १३४ (२)

नवी मुंबई मनपा: ८३ (३)

कल्याण डोंबिवली मनपा: ८४ (२)

उल्हासनगर मनपा: १

भिवंडी निजामपूर मनपा: ३

मीरा भाईंदर मनपा: ७८ (२)

पालघर: १७ (१)

वसई विरार मनपा: १०७ (३)

रायगड: १५

पनवेल मनपा: ३३ (१)

ठाणे मंडळ एकूण: ३६०७ (१५५)

नाशिक: ४

नाशिक मनपा: ६

मालेगाव मनपा: ८५ (८)

अहमदनगर: २१ (२)

अहमदनगर मनपा: ८

धुळे: १ (१)

धुळे मनपा: ०

जळगाव: १

जळगाव मनपा: २ (१)

नंदूरबार: १

नाशिक मंडळ एकूण: १२९ (१२)

पुणे: १८ (१)

पुणे मनपा: ५९४ (४९)

पिंपरी चिंचवड मनपा: ५१ (१)

सोलापूर: ०

सोलापूर मनपा: २१ (२)

सातारा: १३ (२)

पुणे मंडळ एकूण: ६९७ (५५)

कोल्हापूर: ५

कोल्हापूर मनपा: ३

सांगली: २६

सांगली मिरज कुपवाड मनपा:१

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ७ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४३ (१)

औरंगाबाद:१

औरंगाबाद मनपा: २९ (३)

जालना: १

हिंगोली: १

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)

लातूर: ८

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ०

लातूर मंडळ एकूण: १२

अकोला: ७ (१)

अकोला मनपा: ९

अमरावती: ०

अमरावती मनपा: ६ (१)

यवतमाळ: १५

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ४९ (३)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ६७ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ७३ (१)

इतर राज्ये: १३ (२)

एकूण: ४६६६ (२३२)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६३५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

देशात काय स्थिती?

देशभरात गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढून आता ती १७ हजार ६५६वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ५५९ झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी २ हजार ८४२ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी सध्याकोरोना रुग्णांची दुप्पट वाढ होण्याचा वेग मंदावला आहे. सुरूवातीच्या टप्प्यात दर साडे तीन दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होत होती आता ही संख्या ७.५ दिवसात दुप्पट होत आहे.

रुग्णसंख्या दुपटीनं वाढीचा वेग कमी करण्यावर सरकारचा भर आहे. पुद्दूचेरीमधील मेह, कर्नाटकातील कोडागू आणि उत्तराखंडमधील पुरी गढवाल या जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशातील ५९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सध्या नाहीयेत ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान देशात महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश इथं कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

जगात काय स्थिती?

सध्या जगभरातील 184 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सुमारे 23 लाख 19 हजार 066 वर गेली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 57 हजारहून 970 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. सध्या जगामध्ये 213 देशांमध्ये कोरोना चा प्रसार झाला आहे.

Updated : 21 April 2020 2:22 AM GMT
Next Story
Share it
Top