News Update
Home > Election 2020 > टिव्ही डिबेटवर काँग्रेसचा बँन ?

टिव्ही डिबेटवर काँग्रेसचा बँन ?

टिव्ही डिबेटवर काँग्रेसचा बँन ?
X

लोकसभेतील दारुच पराभवानंतर काॅंग्रेसनं आता प्रसार माध्यमांवर जाण्यास स्वतःच्या प्रवक्त्यांना बंदी घातली आहे. काॅंग्रेसच्या कोणत्याही प्रवक्त्याने माध्यमांवरील चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये, असं ट्विट करून काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान पराभवानंतर झालेल्या काँग्रेसच्या ‘चिंतन’ बैठकीत राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मुख्यमंत्री कमलनाथ, पी. चिदंबरम यांनी मुलांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. कमलनाथ यांचे पुत्र कसे बसे विजयी झाले. मात्र राज्यात एक तर राजस्थानात काॅंग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यातच राहुल गांधीचा राजीनामा म्हणजे काँग्रेसची आत्महत्या असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केले आहे.

https://twitter.com/rssurjewala/status/1133924556324954118

Updated : 30 May 2019 5:24 AM GMT
Next Story
Share it
Top