Home > मॅक्स रिपोर्ट > काँग्रेसची पॉलिटिकल स्ट्राईक, निवृत्त लष्करी अधिकारी हुडा काँग्रेसच्या कृती दलाचे प्रमुख

काँग्रेसची पॉलिटिकल स्ट्राईक, निवृत्त लष्करी अधिकारी हुडा काँग्रेसच्या कृती दलाचे प्रमुख

पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेचा विषय अनेक अंगांनी चर्चिला जातोय. एकीकडे भारत-पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणलेले गेले आहेत. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही पॉलिटिकल स्ट्राईक्स सुरू झाल्या आहेत. उरी इथल्या सर्जिकल स्ट्राईक मोहीमेतले हिरो निवृत्त लेफ्टनंट जनरल दीपेंद्र सिंह हुडा यांना काँग्रेस देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तयार केल्या जाणाऱ्या कृती दलाचं प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. त्यांच्या मदतीला इतर तज्ज्ञांची टीमही असणार आहे. ही टीम देशाच्या सुरक्षेसाठीचं व्हिजन डॉक्युमेंट काँग्रेससाठी तयार करणार आहे.

हुडा हे निवृत्त पोलिस अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या टीमचं नेतृत्व करणार आहेत. ही टीम देशाच्या सुरक्षेसमोरील आव्हानांचा अभ्यास करून एक अहवाल तयार करणार आहे. मार्च 2019 अखेपर्यंत हा अहवाल तयार करणार आहे. हुडा यांच्यावर या अहवालाची जबाबदारी 10 दिवसांपूर्वीच देण्यात आल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. सर्जिकल स्ट्राईक सारखी महत्त्वाची मोहीम यशस्वी करणाऱ्या हुडा यांच्या अहवालाचा उपयोग काँग्रेस आगामी निवडणुकांच्या प्रचारात कसा करेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष राहणार आहे.

Updated : 21 Feb 2019 2:52 PM GMT
Next Story
Share it
Top