महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मग कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत कुणाचा प्रचार करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आज अखेर पडदा पडला आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज पक्षाच्या राजगड या कार्यालयामध्ये विभाग अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशा स्पष्ट सूचनाच नांदगावकर यांनी विभाग अध्यक्षांना दिल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मनसेच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे आणमि बिनधास्त प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज यांनी आधीच दिले होते काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचे संकेत
मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी आपली लढाई मोदींविरोधात आहे. शाह आणि मोदी यांना हटवण्यासाठी पक्ष कोणता ते पाहणार नाही. जे पक्ष मोदींचा विरोध करत आहेत त्यांना साथ देणार असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.
Updated : 30 March 2019 2:04 PM GMT
Next Story