Home > मॅक्स रिपोर्ट > MaxMaharashtra Impact : मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

MaxMaharashtra Impact : मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

MaxMaharashtra Impact :  मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल
X

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने दिले होते. या वृत्ताने खळबळ उडाल्याने मुख्यमंत्र्यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीची दखल घेतली. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायती मधील मरकटवाडी येथील वंदना बुधर या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांचा वेळेत ऊपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऐन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात या भागात घटना घडल्याने, संपुर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीरतेने दखल घेतली असून माध्यमांसह सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात सर्वत्र उत्साहात साजरा होत असतांना, सरकार आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी ह्रदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात घडली आहे. मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायती मधील मरकटवाडी येथील वंदना बुधर या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांना वेळेत ऊपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर वंदना ला प्रचंड रक्तश्राव झाल्याने दवाखान्यात दाखल होण्यासाठी, रस्ता नसल्याने डोलीतुन मुसळधार पावसात 3 किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले होते.






या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली तर सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला आहे. तर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पीडीत कुटूंबाची भेट घेऊन मदतीचा हात दिला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर या भागाचे विदारक सत्य समोर आल्याने, त्याचे पडसाद अधिवेशनात ऊमटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मरकटवाडी येथे जाण्यासाठी अर्थसंकल्पीय कामांमध्ये एक किलोमीटर कामास मंजुरी दिली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकार येताच त्यांनी ठाकरे सरकारने घेतलेल्या कामांना स्थगिती दिली आहे.

तसेच या विभागाचे आमदार सुनिल भुसारा यांनी सांगितले की, माझ्या मतदार संघातील ह्या दुर्दैवी घटना घडलेल्या गावाकडे जाण्यासाठी, रस्ता व पुलं बांधण्यासाठी दिड कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र, शिंदे सरकार ने स्थगिती दिलेल्या कामांमध्ये हे काम ही अडकले आहे. हे युती चे सरकार स्थगिती सरकार असल्याची खरमरीत टीका यावेळी भुसारा यांनी केली.





तसेच या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी सांगितले की, या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या स्विय सहाय्यकाने माझ्याकडुन घटनेची माहिती घेतली आहे. तसेच या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी सांगितले आहे.

शासनाने रस्त्याची व्यवस्था करणे गरजेचे तर आहेच. मात्र या भागात तातडीची गरज येथील आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांचे जीव वाचवण्यासाठी येथे तातडीने आरोग्य पथक अथवा रेस्कु कॅम्प स्थापन करण्यात यावा अशी मागणी भाजप आदिवासी विकास आघाडीचे प्रदेश सरचिटणीस डॉ हेमंत सवरा यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी सांगितले आहे.


Updated : 17 Aug 2022 7:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top