Home > Election 2020 > संविधान बदलणं नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, जयदीप कवाडेंचं स्मृती इराणींबाबत वादग्रस्त वक्तव्य
संविधान बदलणं नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, जयदीप कवाडेंचं स्मृती इराणींबाबत वादग्रस्त वक्तव्य
Max Maharashtra | 2 April 2019 10:33 AM GMT
X
X
निवडणुकांच्या तारखा ज्या प्रमाणे जवळ येत आहे. त्या प्रमाणे निवडणूकीतील राजकीय पुढाऱ्यांची भाषा देखील घसरताना दिसत आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी तर हद्दट केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर टीका करताना त्यांची जीभ चांगलीच घसरली. स्मृती इराणी बाबत बोलताना त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. ‘संविधान बदलणं नवरा बदलण्याइतकं सोपं नसल्याचं म्हणत कवाडे यांनी इराणी यांना लक्ष्य केलं. ते नागपूर येथे माजी खासदार व काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
काय म्हणाले जयदीप कवाडे?
‘स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नाही.’
https://youtu.be/I5zJLhR0yEs
कवाडे यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जयदीप कवाडेंचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी कवाडेंना शाबासकी देत कौतुकही केले.
दरम्यान जयदीप कवाडे यांच्या या बेजबाबदार वक्तव्यानंतर महिला राजकारण्यांबाबत असं आक्षेपार्य़ वक्तव्य कधी थांबतील असा सवाल उपस्थित होत असून महिलांबाबत राजकारण्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन या वाक्यातून स्पष्ट होतो. तसंच अशा बेजबाबदार वक्तव्यामुळेच महिला राजकारणात फारशा येत नाहीत. त्यामुळे महिलांबाबत अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्यांच्या तोंडाला लगाम घालणं गरजेच असून अशा वक्तव्यानंतर ज्या पद्धतीने हास्यकल्लोळ होतो तो निश्चितच निषेधार्य आहे.
Updated : 2 April 2019 10:33 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire