News Update
Home > Election 2020 > देशात चहावाला आणि महाराष्ट्रात कपबशीवाला मोठा फॅक्टर

देशात चहावाला आणि महाराष्ट्रात कपबशीवाला मोठा फॅक्टर

देशात चहावाला आणि महाराष्ट्रात कपबशीवाला मोठा फॅक्टर
X

चायवाला, चौकीदार अशी नानाविध विशेषणं लागलेल्या नरेंद्र मोदींना 2019 मध्येही देशभरातील मतदारांनी भरघोस मतं दिली आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातल्या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. देशात चायवाला आणि महाराष्ट्रात कपबशीवाला म्हणजेच वंचित बहुजन आघाडी हा मोठा फॅक्टर म्हणून पुढे आला आहे. जवळपास 10 जागांवर वंचितच्या उमेदवारांना पडलेल्या मतांमुळं काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांना जवळपास मोठा फटका बसलाय. त्यामुळंचं महाराष्ट्रात कपबशी हे निवडणूक चिन्हं घेऊन निवडणूक लढवलेली वंचित बहुजन आघाडी मोठा फॅक्टर ठरलीय. खाली दिलेली आकडेवारी हा पूर्ण निकाल नाही. मात्र, उपलब्ध वेळेतल्या या आकडेवारीत थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकतो.

अकोला –

संजय धोतरे – भाजप – मिळालेली मतं – 476735 – मतांची टक्केवारी - 49.17

हिदायतुल्ला पटेल – काँग्रेस – मिळालेली मतं - 231175 मतांची टक्केवारी - 22.85

प्रकाश आंबेडकर – वंचित बहुजन आघाडी – 253053 मतांची टक्केवारी - 25.16

वंचितमुळं काय झालं ?

काँग्रेस आणि वंचितची मतं एकत्र केली तर 4,84,228 लाख मतं होतात. म्हणजे अकोल्यामध्ये काँग्रेस आघाडी किंवा वंचित अशी आघाडी झाली असती तर त्यांचा उमेदवार हा 7,493 मतांनी सहज निवडून आला असता.

औरंगाबाद –

इम्तियाज जलील – एमआयएम - मिळालेली मतं 388115 - मतांची टक्केवारी - 32.52

चंद्रकांत खैरे – शिवसेना – मिळालेली मतं – 382395 - मतांची टक्केवारी - 32.08

हर्षवर्धन जाधव – अपक्ष – मिळालेली मतं – 281986 मतांची टक्केवारी - 23.66

सुभाष झांबड – काँग्रेस – मिळालेली मतं – 91300 मतांची टक्केवारी - 7.65

वंचितमुळं काय झालं ?

औरंगाबादमध्ये वंचित आणि काँग्रेस एकत्र आली असती तर त्यांचा उमेदवार सहज निवडून आला असता. मात्र, वंचितनं स्वबळावर लढत या मतदारसंघात लढत विजय मिळवला आहे. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 81 हजार 986 मतं घेतल्यानं चंद्रकांत खैरे यांचा पराभव झालाय.

बुलढाणा

प्रतापराव जाधव – शिवसेना - मिळालेली मतं 365158 - मतांची टक्केवारी - 46.63

डॉ. राजेंद्र शिंगणे – राष्ट्रवादी काँग्रेस – मिळालेली मतं – 272082 मतांची टक्केवारी - 34.75

बळीराम शिरस्कार – वंचित – मिळालेली मतं – 119236 मतांची टक्केवारी -15.23

वंचितमुळं नेमकं काय झालं ?

वंचितचे शिरस्कार आणि राष्ट्रवादीचे शिंगणे यांना मिळालेल्या मतांची बेरीज केल्यास याठिकाणी वंचित किंवा राष्ट्रवादी एकत्र आघाडी करून लढले असते तर त्यांना 3 लाख 91 हजार 318 मतं मिळाली असती. म्हणजेच शिवसेनेचे विजयी उमेदवार जाधव यांच्यापेक्षा 26 हजार 160 मतांच्या आघाडीनं वंचित किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार बुलढाण्यात निवडून आला असता.

चंद्रपूर –

हंसराज अहीर – भाजप – मिळालेली मतं – 194254 मतांची टक्केवारी - 40.92

बाळू धानोरकर – काँग्रेस – मिळालेली मतं - 216532 मतांची टक्केवारी - 45.61

राजेंद्र महाडोले – वंचित - मिळालेली मतं - 43707 मतांची टक्केवारी - 9.21

वंचितमुळं काय झालं

चंद्रपूरमध्ये वंचितमुळं विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव झाल्याचं चित्र दिसतंय. हंसराज अहीर आणि काँग्रेसच्या धानोरकर यांच्यात फक्त 22 हजार 278 मतांचा फरक आहे. कारण या मतदारसंघात वंचितच्या महाडोले यांना 43 हजार 707 मतं मिळालेली आहेत.

गडचिरोली – चिमूर

अशोक नेते - भाजप – मिळालेली मतं – 421615 मतांची टक्केवारी - 45.63

डॉ. नामदेव उसेंडी – काँग्रेस – मिळालेली मतं – 349549 मतांची टक्केवारी - 37.83

डॉ. रमेशकुमार गजबे – वंचित- मिळालेली मतं – 99911 मतांची टक्केवारी – 10.81

वंचितमुळं काय झालं

काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज ही 449460 इतकी होते. ती भाजपचे विजयी उमेदवार अशोक नेते यांच्यापेक्षा 27,845 मतांनी अधिक होते. त्यामुळं वंचितला मिळालेल्या मतांमुळं गडचिरोलीमध्येही काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्याचं स्पष्ट होतंय.

हातकणंगले

धैर्यशील माने – शिवसेना – मिळालेली मतं – 509221 मतांची टक्केवारी – 47.56

राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटना – मिळालेली मतं – 409640 मतांची टक्केवारी – 38.26

असलम सय्यद – वंचित – मिळालेली मतं – 105960 मतांची टक्केवारी – 9.9

वंचितमुळं काय झालं

या मतदारसंघात वंचितमुळंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांन पराभव पत्करावा लागलाय. कारण वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी आणि वंचितच्या असलम सय्यद यांच्या मतांची आकडेवारी ही 515600 इतकी होते. तर शिवसेनेचे धैर्यशील यांना 509221 इतकी मतं मिळालेली आहेत. म्हणजेच वंचित आणि स्वाभिमानी एकत्र लढले असते तर 6379 मतांनी त्यांचा विजय झाला असता.

नांदेड

प्रताप पाटील चिखलीकर – भाजप – मिळालेली मतं – 443445 मतांची टक्केवारी - 42.72

अशोक चव्हाण – काँग्रेस – मिळालेली मतं – 417875 मतांची टक्केवारी - 39.63

यशपाल भिंगे – वंचित – मिळालेली मतं – 156555 मतांची टक्केवारी – 15.08

वंचितमुळं काय झालं

काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये 32019 इतक्या मतांचा फरक आहे. तर दुसरीकडे एकट्या वंचितच्या उमेदवाराला 156555 इतकी मतं मिळालेली आहेत. काँग्रेस आणि वंचित एकत्रित लढले असते तर त्यांच्या उमेदवाराला 567981 इतकी मतं मिळाली असती. वंचित आणि काँग्रेस आघाडीचा उमेदवार हा 124536 मतांनी निवडूनही आला असता.

परभणी

संजय जाधव – शिवसेना – मिळालेली मतं – 431800 मतांची टक्केवारी – 42.64

राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस – मिळालेली मतं – 405027 मतांची टक्केवारी – 39.99

आलमगीर खान – वंचित – मिळालेली मतं – 121430 – मतांची टक्केवारी – 11.99

वंचितमुळं काय झालं

राष्ट्रवादी आणि वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांची बेरीज ही 526457 इतकी होते. ती शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा 94657 इतक्या मतांनी जास्त आहे. मात्र, इथंही वंचितमुळं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागलाय.

सांगली

संजय पाटील – भाजप – मिळालेली मतं - 463245 मतांची टक्केवारी - 42.84

विशाल पाटील – स्वाभिमानी शेतकरी संघटना – मिळालेली मतं – 267724 मतांची टक्केवारी - 24.76

गोपीचंद पडळकर – वंचित – मिळालेली मतं – 281020 मतांची टक्केवारी – 25.14

वंचितमुळं काय झालं

भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी वंचितचे पडळकर यांचा तब्बल 182225 मतांनी पराभव केलेला आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित एकत्र लढले असते तर त्यांना 548744 मतं मिळून त्यांचा उमेदवार हा 85499 इतक्या मतांनी निवडूनही आला असता. त्यामुळं सांगलीमध्ये वंचितच्या पडळकर यांच्यामुळंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पराभव स्विकारावा लागल्याचं चित्र पुढे येत आहे.

सोलापूर

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी – भाजप – मिळालेली मतं – 498752 मतांची टक्केवारी – 48.29

सुशीलकुमार शिंदे – काँग्रेस – मिळालेली मतं – 350996 मतांची टक्केवारी – 33.98

प्रकाश आंबेडकर – वंचित – मिळालेली मतं – 160736 मतांची टक्केवारी – 15.56

वंचितमुळं काय घडलं

सोलापूरसारख्या हायप्रोफाईल मतदारसंघातही प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळं काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याचा पराभव झालाय. कारण काँग्रेस आणि वंचित मिळालेल्या मतांची बेरीज ही 511732 इतकी होते. भाजपच्या डॉ. महास्वामी आणि काँग्रेसच्या शिंदे यांच्यात मतांची तफावत ही फक्त 12960 इतकीच आहे. तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना 160736 इतकी मतं मिळालेली आहेत.

Updated : 23 May 2019 3:33 PM GMT
Next Story
Share it
Top