Home > Election 2020 > भाजपाला मत दिल्याने मुस्लिम मतदारावर जातीय बहिष्कार

भाजपाला मत दिल्याने मुस्लिम मतदारावर जातीय बहिष्कार

भाजपाला मत दिल्याने मुस्लिम मतदारावर जातीय बहिष्कार
X

देशात धर्मनिरपेक्ष लोकशाही नांदत असून जात पात धर्म प्रांत यांच्यापलिकडे जावून लोकशाहीत राजकीय पक्ष विचार करतात, असे भासवले जात असले तरी मतदानावर जातीय पगडा किती प्रमाणात असतो, याची उदाहरणे आता देशभरातून समोर येवू लागली आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशात भाजपला चुकून मत दिल्यामुळे एका व्यक्तीने बोट कापल्याची घटना समोर आली होती. त्यापाठोपाठ आता आसाममधील एका मुस्लीम व्यक्तीला भाजपला मतदान केल्यामुळे जातीय बहिष्काराचा सामना कराव लागतो आहे.

आसामच्या नादिरकहा गावात ही घटना घडली असून येथील जफर अली या व्यक्तीने भाजपला मतदान केले होते. त्यामुळे त्याच्या मुस्लिम धर्मातील लोक त्याच्यावर नाराज आहेत. मुस्लीम समाजाने त्याला नमाज पठण करण्यास मज्जाव केला आहे. जाफर अलीने भाजप उमेदवार दिलीप सईकियाला मतदान केले होते त्यामुळे त्याच्याविरोधात ही कारवाई केली असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

आसाममधील मुस्लीम समुदायाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती पुढे येत असून जे कोणी भाजपला मतदान करतील ते मुस्लीम नाहीत, अशी येथील मुस्लिमांमध्ये चर्चा आहे. याच आधारावर जफर याला नमाज पठणापासून रोखण्यात येत आहे, असे म्हटले जात आहे.

या सामाजिक बहिष्काराची तक्रार जफर याने पोलिसांत नोंदवली आहे. पोलिसांनी भादंवि २९३,२९६,३५३ अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे. तसेच नमाज पठणापासून रोखणा-या आरोपींविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याते येईल, असे पोलीसांनी सांगितले आहे.

Updated : 22 April 2019 8:01 AM GMT
Next Story
Share it
Top