Home > मॅक्स रिपोर्ट > #मंदीयात्रा : मंदीच्या विळख्यात शेअर मार्केट

#मंदीयात्रा : मंदीच्या विळख्यात शेअर मार्केट

#मंदीयात्रा : मंदीच्या विळख्यात शेअर मार्केट
X

शेअर बाजार. एक असा बाजार ज्याठिकाणी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. सुरूवातीच्या काळात शेअर्सची खरेदी-विक्री तोंडी होत असे. खरेदीदार आणि विक्रेता लिलावामार्फत हे व्यवहार करत होते. मात्र, आता हे सर्व व्यवहार शेअर बाजाराच्या नेटवर्कने जोडलेल्या काॅम्प्युटरमार्फत होतो. इंटरनेटवरही ही सुविधा मिळते. आता अशी परिस्थिती आहे की खरेदीदार आणि विक्रेता एकमेकांना ओळखत नाहीत मात्र व्यवहार होतात.

काही वर्षांपूर्वी मुंबई शेअर बाजारात थेट खरेदी-विक्री करावी लागत होती. मात्र, मागील काही वर्षांपासून काॅम्प्युटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून कोणीही घरबसल्या शेअर्स खरेदी करू शकतो आणि विकूही शकतो. अवघ्या काही सेकंदामध्ये हा व्यवहार पूर्ण होतो. आता तर मोबाइल अॅप्समार्फतही आपण हे व्यवहार अगदी सहजपणे करू शकतो. माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे हे उत्कृष्ठ उदाहरण आहे. जे काम पूर्वी फक्त काही निवडक श्रीमंत करू शकत होते ते आता एक सर्वसामान्य माणूसही करू शकतो. डीमॅट खात्यामार्फत शेअर विकत घेऊ शकतो आणि विकू शकतो.

प्रत्येक कंपनीला व्यवसाय वाढीसाठी भांडवलाची गरज पडते. या कंपन्या शेअर बाजारात आपले शेअर्स विकून भांडवल उभे करतात. बहुतांशी कंपन्या व्याज देऊन कर्ज घेण्यापेक्षा शेअर बाजारातून भांडवल उभारण्यास प्राधान्य देतात. प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ-IPO) या कंपन्या शेअर बाजारात सर्वसामान्य व्यक्तींना शेअर्स विकून पैसे गोळा करतात. आयपीओ काढून शेअर्स विक्री करणे यालाच प्राथमिक शेअर बाजार (primary market)म्हणतात.

आयपीओनंतर त्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होते. म्हणजे ती कंपनी लिस्टेड होते. त्यानंतर तिच्या शेअर्समध्ये ट्रेडिंगला सुरुवात होते. ज्या कंपन्या आधीच शेअर बाजारात लिस्टेड असतात त्या कंपन्यांच्या शेअर्सची रोज खरेदी-विक्री होते. यालाच दुय्यम बाजार(Secondary market)म्हणतात.

https://youtu.be/xqyqDAtQpuU

Updated : 29 Aug 2019 11:44 AM GMT
Next Story
Share it
Top