भाजपच्या जाहिरातीत लहान मुलांच्या तोंडी ‘’घुसेंगे-मारेंगे’’
Max Maharashtra | 5 April 2019 4:57 PM IST
X
X
मतदानाच्या तारखा जवळ येऊ लागल्यात तसा प्रचारही शिगेला पोहोचतोय. त्यात भाजपच्या समर्थनार्थ तयार केलेला एक व्हिडिओ सध्या वादात सापडलाय. या व्हिडिओमध्ये ६ ते ९ वर्षांच्या मुलांच्या तोंडी ‘हम घुसेंगे भी, मारेंगे भी, अशा संवादांचा वापर करण्यात आलाय. मै भी चौकीदार या कॅम्पेन अंतर्गत हे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भाजपनं लोकसभा निवडणूक २०१९ साठी मै भी चौकीदार अशी कॅम्पेन सुरू केलीय. चहाच्या कपापासून ते सर्वत्र ही कॅम्पेन राबवण्यात येत आहे. भाजपच्या या १ मिनिटं १५ सेकंदांच्या व्हिडिओत ६ ते ९ वर्षे वयोगटातील लहान मुलांचा वापर करण्यात आलाय. त्यात धर्म, प्रांतांचं प्रतिनिधीत्व करणारी वेशभुषाही दाखवण्यात आली आहे.
या जाहिरातीमध्ये लहान मुलं ‘‘देश मेरा घर है, देश मेरा सम्मान है, जो देश का सम्मान करेगा मैं उसका सम्मान करुंगा, ये नया भारत है, हम घुसेंगे भी और मारेंगे भी’’ असं हिंसात्मक ही मुलं बोलत आहेत. विशेष म्हणजे भाजपने यात आचारसंहितेचं पुन्हा एकदा उल्लंघन करत सैन्याशी निगडीत दृश्यांचाही वापर केला आहे. यावर बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, हे बालहक्क कायद्याचं उल्लंघन आहे. भाजप सोबत आता शेतकरी नाहीत, तरुण नाहीत की कुणी नाही म्हणून आता लहान मुलांचा वापर भाजप करत आहे. असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे.
https://youtu.be/TPtaHa3aHpM
Updated : 5 April 2019 4:57 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire