Home > मॅक्स रिपोर्ट > भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा आणण्याचे प्रयत्न : नितीन गडकरी

भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा आणण्याचे प्रयत्न : नितीन गडकरी

भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा आणण्याचे प्रयत्न : नितीन गडकरी
X

स्वप्न पूर्ण न केल्यास नेत्यांना जनतेचा मार खावा लागतो! असं म्हणत गडकरींनी भाजपच्या नेतृत्वावर निशाणा साधला अशा बातम्या प्रसार माध्यमांवर झळकल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं ट्वीट केलं आहे.

लोकसभा निवडणूक हरलेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो का हरलास तेव्हा तो ‘फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही’, असे कारण देतो. पण माझे म्हणणं आहे. की यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे. असं विधान देखील गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले होते. त्यानंतर या वाक्याचा संदर्भ पाच निवडणुकांशी जोडून भाजप नेतृत्वावर गडकरी यांनी निशाणा साधला होता. भाजपने प्रत्येक राज्यात निवडणुकीत यश मिळवल्यानंतर त्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं गेलं. मात्र, पाच राज्याच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, या पराजयाची जबाबदारी मोदींनी घेतली नाही. हाच धागा पकडत भाजपचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात होतं. यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते, असं विधान करत गडकरी यांनी यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे, असा सल्ला दिला होता. त्यानंतर या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये सध्या हलचल सुरु आहे का? असा सवाल उपस्थित केल्यानंतर गडकरी यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हटलं आहे गडकरींनी?

मी कुठल्याही गोष्टीवर वक्तव्य केल्यास त्या वक्तव्याची मोडतोड करून भलताच अर्थ काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून आणि माध्यमातील ठराविक गटांकडून होताना गेल्या काही दिवसांपासून दिसत असल्याचं गडकरी यांनी म्हटलं असून हे सर्व भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा निर्माण करण्यासाठीच सुरु असल्याचं सांगितलं आहे. यातून मला आणि माझ्या पक्षाला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्नही होत आहे. मी अशा गोष्टी बारकाईने तपासण्याचा प्रयत्न करत असून वेळोवेळी अशा गोष्टींवर निर्बंध घालण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. असं देखील गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘त्यांचा' हेतू कधीच साध्य होणार नाही

''माझ्या वक्तव्य्यांची अशी मोडतोड केल्याने भाजप नेतृत्व आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांचा हेतू कधीच साध्य होणार नाही. मी वेळोवेळी माझ्या कामाविषयी वेगवेगळ्या ठिकाणी स्पष्टीकरण देत राहिलो जेणेकरून विरोधकांचा कुठलाच हेतू साध्य होणार नाही.” असं गडकरी यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं असून गडकरी यांच्या या स्पष्टीकरणातून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात हलचल असल्याचं बोललं जात असून गडकरी यांनी आत्ता पर्यंत अच्छे दिनाचं हाडूक भाजपच्या गळ्यात अडकल्यासारखी विधान केली होती. मात्र, त्यांनी कधीही या विधानाचं स्पष्टीकरण दिलं नव्हतं. मात्र, गडकरी यांनी हे स्पष्टीकरण दिल्यानं खरंच गडकरी यांच्याविरोधात कोणी जाणून बुजून असं करतंय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

https://twitter.com/nitin_gadkari/status/1076728236577603584

https://twitter.com/nitin_gadkari/status/1076728243326210048

Updated : 23 Dec 2018 10:16 AM GMT
Next Story
Share it
Top