Home > Election 2020 > किरीट सोमय्यांचा पत्ता कट, कोटक यांना लोकसभेची उमेदवारी

किरीट सोमय्यांचा पत्ता कट, कोटक यांना लोकसभेची उमेदवारी

किरीट सोमय्यांचा पत्ता कट, कोटक यांना लोकसभेची उमेदवारी
X

शिवसेनेच्या प्रचंड विरोधापुढं भाजपनं अखेर माघार घेत मनोज कोटक यांना मुंबईतल्या उत्तर-पूर्व मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं विद्यमान खासदार किरीट सोमय्यांचा अपेक्षेप्रमाणं पत्ता कट झाला आहे.

शिवसेना आणि त्यातही थेट ठाकरे कुटुंबियांवर केलेल्या वक्तव्यांमुळंच सोमय्या यांचा पत्ता कट होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत, त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांचाही टोकाचा विरोध होता. त्यामुळं शिवसेनेच्या विरोधापुढं झुकतं माप घेत भाजपनं अखेर उमेदवारांच्या १६ व्या यादीत या मतदारसंघातून मनोज कोटक यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

कोटक हे मुलुंडमधून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच ते मुंबई महापालिकेत भाजपचे गटनेते म्हणूनही कार्यरत होते. कोटक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. फडणवीस यांनी दोनवेळा कोटक यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यासाठीही प्रयत्न केले होते.

Updated : 3 April 2019 11:25 AM GMT
Next Story
Share it
Top