Home > Election 2020 > भाजपला मतदान न केल्यास परिणामांना तयार राहा – कुकी आर्मीचा इशारा

भाजपला मतदान न केल्यास परिणामांना तयार राहा – कुकी आर्मीचा इशारा

भाजपला मतदान न केल्यास परिणामांना तयार राहा – कुकी आर्मीचा इशारा
X

सध्या लोकसभा निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहोचू लागलाय. अशा परिस्थितीत प्रत्येक पक्ष हा मतदारांना आकर्षित कऱण्यासाठी जिवाचं रान करतोय. मात्र, उत्तर-पूर्वेच्या राज्यातल्या मणिपूरमध्ये बंडखोरांच्या कुकी नॅशनल आर्मीनं ग्रामस्थांना धमक्या द्यायला सुरूवात केलीय.

मणिपूरमधील गावांमध्ये जाऊन सध्या कुकी नॅशनल आर्मी ग्रामस्थांसह गावच्या सरपंचांना भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी धमकावत आहे. भाजप उमेदवाराला ९० टक्के मतदान न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम लोकांना भोगावे लागतील, असा इशाराही कुकी आर्मीनं दिलाय.

कुकी आर्मीचा कमांडर थांगबोई याच्या सभा मुनतफई आणि मोरेह गावात झाल्या. सभेला या दोन्ही गावांचे सरपंचही उपस्थित होते. या सभेत थांगबोईनं भाजपाचे उमेदवार एचएस बेंजामिन मेट यांचा आपल्या भाषणात थेट उल्लेख केला. गरज पडल्यास हिंसाचाराचा आधारदेखील घेतला जाईल, असा इशारा थांगबोईंने यावेळी दिला.

ग्रामस्थांना कुकी आर्मीच्या आदेशाचं पालन करावंच लागेल. अन्यथा परिणामांना सामोरं जावे लागेल, अशी जाहीर धमकीच थांगबोईनं यावेळी दिली.

कुकी आर्मीच्या गटात महिलांची संख्या आहे. मात्र, तरीही येत्या 11 एप्रिलला 200 महिलांची एक विशेष तुकडी मतदान केंद्रांवर तैनात असेल, असं थांगबोईनं सांगितलं. पुरुष असो वा महिला, प्रत्येकाला कुकी आर्मीचा आदेश मानावाच लागेल. अन्यथा कोणालाही सोडणार नाही, असंही थांगबोईनं सांगितलं. मतदानानंतर मतदाननाच् टक्केवारीची पडताळणी केली जाणार असल्याचंही थांगबोईनं स्पष्ट केलं.

Updated : 8 April 2019 3:07 PM GMT
Next Story
Share it
Top