Home > मॅक्स रिपोर्ट > जनतेचा जाहीरनामा ;वरुन पाऊस, खालून समुद्र, नागरिक झाले बेहाल...

जनतेचा जाहीरनामा ;वरुन पाऊस, खालून समुद्र, नागरिक झाले बेहाल...

जनतेचा जाहीरनामा ;वरुन पाऊस, खालून समुद्र, नागरिक झाले बेहाल...
X

मुंबईतील वाळकेश्वर विभागातील हा समुद्र, गेल्या अनेक वर्षांपासून वाळकेश्वरच्या या समुद्राला भरती आली की, भरतीच पाणी नाल्यात साठत आणि नाल्यातलं पाणी नागरिकांच्या घरात शिरत, ही परिस्थिती इथेच संपत नाही, पावसाळ्याच्या कालावधी पहिल्यापेक्षा अधिक वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतोय, पावसाळ्यातील ही पाऊस जास्त प्रमाणात पडला की पावसाळ्यात याच नागरिकांच्या घरात पाणी साठतं मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार मदतीसाठी बोलावलं तरी देखील महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या मदतीला धावून जात नाहीत. तिथूनच हाकेच्या अंतरावर राज्यपालांच शासकीय निवासस्थान आहे. त्यांनाही दृश्य अनेकदा नजरेस पडले असतील. पण सामान्य नागरिकांना मदतीचा हात देणार तरी कोण... अश्यातच महानगरपालिकेचा कामांचा दुर्लक्षितपणामुळे. आता आम्हाला कोण न्याय देणार. असा प्रश्न जनतेच्या जाहीरनामा तून थेट महानगरपालिकेतील अधिकाऱ्याला जनतेने प्रतिनिधी प्रसेनजीत जाधव यांनी विचारलेला प्रश्न...






मुंबईतील वाळकेश्वर परिसरात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे बंगले आहेत. परंतु याच परिसरात झोपडपट्टीचा देखील मोठ्या प्रमाणात विस्तार पाहायला मिळतोय. या परिसरात सुमारे दोन हजारहून अधिक लोक राहतात.या परिसरात जेव्हा समुद्राला भरती येते त्यावेळी समुद्राचं पाणी नाल्यात साचत आणि आणि हेच पाणी झोपडपट्टीमधील स्थानिक नागरिकांच्या घरात शिरत. ही परिस्थिती एवढ्यावरच थांबत नाही. अशीच परिस्थिती पावसाळ्यात देखील पाहायला मिळते, पाऊस जास्त प्रमाणात पडला की पाणी नागरिकांच्या घरात शिरत त्यामुळे राहायचं तरी कुठं आणि आयुष्याचा संसार मांडायचं तरी कुठं असा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात पडलाय. तेथील स्थानिक नागरिक मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यांना नोकरीसाठी बाहेर पडता येत नाही. हाकेच्या अंतरावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे शासकीय निवासस्थान आहे. त्यांनी कदाचित सामान्य नागरिकांची भीषण परिस्थिती पाहिली ही असेल. पण मदतीसाठी हात न दिल्यामुळे आमच्या समस्याच्या निराकरण कधी होणार या प्रश्नाचे उत्तर स्थानिक नागरिकांना सापडत नाही.





मुंबईची तुंबई होताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल. परंतु समुद्राच्या पाण्यातून झोपडपट्टीतील तुंबई होताना आपण पहिल्यांदाच पाहत असाल. या ठिकाणी अनेक मंत्री महोदयांचे शासकीय निवासस्थाने आहेत. तेथील स्थानिक मंत्र्यांना देखील ही परिस्थिती माहिती आहे परंतु मदतीसाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याची स्थानिक नागरिकांच म्हणण आहे. त्यामुळे आमची समस्या सोडवण्यासाठी फक्त निवडणुकीपूर्वी आश्वासन दिल जात पण मदतीचे अपेक्षा नेमकी कोणाकडून ठेवावी असा देखील स्थानिक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नगरसेवक आणि आमदारही आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे महानगरपालिकेला अनेकदा पत्रव्यवहार करून देखील ही तात्पुरत्या स्वरूपात येतात साफ करतात आणि घरातील साठलेलं पाणी निघून जात, परंतु कायमस्वरूपी या समस्या वर उपाय काढला जात नाही.





गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या त्रासाला येथील स्थानिक नागरिक वैतागलेले असून जर कायमस्वरूपी यातून मार्ग नाही निघाला तर आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला जाईल असे स्थानिक लोकांनी म्हणलेल आहे. त्यामुळे भविष्यात या नागरिकांची समस्या दूर करण्यासाठी नेमकी कोणत्या प्रशासनाला मुख्य भूमिका घ्यावी लागेल हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहावं लागेल.

Updated : 30 Aug 2022 10:39 AM GMT
Next Story
Share it
Top