Home > मॅक्स रिपोर्ट > कोल्हापुरमध्ये शिरदवाड ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

कोल्हापुरमध्ये शिरदवाड ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

कोल्हापुरमध्ये शिरदवाड ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचे निर्विवाद वर्चस्व
X

राज्याच्या राजकारणात पिछाडीवर पडली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी वंचित बहुजन आघाडीच्या मुक्ता बरगाले यांची तर उपसरपंच पदी शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवड झाली आहे.

तालुक्यात चर्चेची ठरलेली ग्रामपंचायत म्हणून शिरदवाड ग्रामपंचायतीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, वंचित बहुजन आघाडी ने 100 टक्के यश मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर सरपंच पदाचे फेरबदल झल्यांनंतर राजकीय उलथापालथ गावामध्ये झाली, पण तरीही वंचित बहुजन आघाडी ने सत्तेवरील पकड कायम ठेवली.काल झालेल्या पद निवडीच्या पहिल्या सभेमध्ये सरपंच पदासाठी मुक्ता बारगाले यांनी व पिंटू टोणपे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. विरोधी गटांच्या वतीने महादेव कोळी यांनी व बंडू बरगाले यांनी अर्ज घेतलेले होते पण त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.कोणताही विरोधी अर्ज दाखल झाला नसल्यामुळे मुक्ता बरगाले यांची सरपंच म्हणून व प्रकाश टोणपे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी बी. पी. कांबळे यांनी केली.

सदरची निवड ही शिरद्वाड ग्रामपंचायतीच्या इतिहासातील पहिलीच बिनविरोध निवड असून कोणताही प्रकारचा सत्तेचा घोडेबाजार वंचित बहुजन आघाडी ने होऊ दिला नाही विशेष म्हणजे निवडीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्व उमेदवार हे कोणत्याही अज्ञात स्थळी किंवा ट्रिप ला नेण्याचा पारंपरिक पायंडा त्यांनी मोडून काढला. त्यांच्या या विश्वासू राजकारनामुळे गावातून त्यांचे कौतुक होत आहे, व गावकऱ्यांच्या मनातगावच्या सर्वांगीण विकासविषयी सकारात्मक आशा निर्माण झाल्या आहेत.यावेळी वंचित बहुजन आघाडी चे मुक्ता बरगाले, पिंटू टोणपे, अर्जुन कांबळे, ज्योती कांबळे, राजश्री गोडबोले, महादेव कुंभार, विनायक कांबळे, रविना कांबळे यांचा व शिरदवाड ग्रामविकास आघाडी चे प्रवीण पाटील, बाबासो आरेकर, अंजना पगडे यांचा सामूहिक सत्कार ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला. त्यांनतर विजयी रॅली गावामध्ये काढण्यात आली, त्यावेळी वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी,महिला व कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामध्ये तालुकाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा युवक उपाध्यक्ष संदीप कांबळे, प्रकाश कांबळे, सुभाष कांबळे, सुभाष टोनपे, महेंद्र कांबळे, उमेश कुरणे, नामदेव कुरणे, सुमित टोणपे,सुनीता सचिन कांबळे, सरला कांबळे, इत्यादी महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 28 Feb 2021 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top